'Yamaha'ची थ्री व्हीलर स्कूटर; पाहा स्कूटरचा आकर्षक लूक

'यामाहा' कंपनीने तीन चाकांची पहिली New Tricity 300 स्कूटर आणली आहे. या स्कूटरचं डिझाइन जबरदस्त आकर्षक असल्याचं पाहायला मिळतंय. 'यामाहा'ने ही स्कूटर टोकियो मोटर शो २०१९ मध्ये प्रदर्शित केली होती. पण अद्याप कंपनीकडून या स्कूटरबाबत संपूर्ण माहिती देण्यात आलेली नाही.

Oct 26, 2019, 20:49 PM IST
1/6

New Tricity 300ला पुढच्या बाजूने दोन फ्रन्ट व्हील देण्यात आले आहेत. 

2/6

या स्कूटरमध्ये अॅडव्हान्स BLUE CORE 300cc liquid cooled 4 stroke इंजिन लावण्यात आलं आहे. लांब प्रवासात आणि हायवेवर चालवण्यासाठी ही जबरदस्त सवारी ठरेल असं बोललं जात आहे.  

3/6

स्कूटरला लावण्यात आलेले थ्री व्हिल्स, चालकाला वेगळाच अनुभव देतात. स्कूटर वजनानेही तुलनेत हलकी असल्याचं बोललं जात आहे.

4/6

कंपनीकडून स्कूटरच्या स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण कंपनीने ही स्कूटर चालवण्यास अतिशय सहज आणि सोपी असल्याचा दावा केला आहे.

5/6

मिळालेल्या माहितीनुसार 'यामाहा', या स्कूटरच्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशनबाबत EICMA 2019 मध्ये माहिती देणार असल्याचं बोललं जात आहे.

6/6

ही स्कूटर अशाप्रकारे डिझाइन करण्यात आली आहे की, शहरात जाण्या-येण्यासाठी ती अतिशय फिट आहे. स्कूटर वजनाने हलकी असून तिच्या देखभालीचा खर्चही अधिक नसल्याचा दावा कंपनीने केला आहे.