अशक्य! क्रूर शासक Kim Jong Un यांची लेक वयाच्या 12 व्या वर्षी हे काय करतेय? पाहा Photos

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!

Nov 25, 2022, 13:46 PM IST

Kim Jong Un: उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशाह किम जोंग उन यांच्या मुलीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये पहिल्यांदाच लेक जगासमोर आली. पहिल्यांदाच ही चिमुकली तिच्या बाबांसोबत दिसली. चिमुरडीला अनपेक्षित ठिकाणी पाहून अनेकजण म्हणाजे... हे तर अशक्य!

1/7

मिसाईल लॉन्चिंगदरम्यान Kim Jong Un एका लहान मुलीचा हात पकडताना दिसले. यापूर्वी कधीच ती जगासमोर आलेली नव्हती. देशातील सरकारी वृत्त वाहिनी KCNA नं दिलेल्या माहितीनुसार ही चिमुकली किम जोंग उन यांची मुलगी आहे. (kim jong un daughter)

2/7

Hwasong-17 ICBM या मिसाईलच्या टेस्टिंगरम्यान 12 वर्षांच्या या चिमुकलीला पाहून अनेकांनाच धक्का बसला. तिच्या नावाचा खुलासा अद्याप होऊ शकला नसला तरीही  Ju Ae असं तिचं नाव असून, तिचं वय 12 ते 13 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे. 

3/7

असं म्हटलं जातं की, किम जोंग यांना तीन मुलं आहेत. यामध्ये दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. एकाएकी किम जोंग उन यांच्या लेकिचं जगासमोर येणं पाहता येत्या काळातील सत्ताबदलाची किंवा नव्या पिढीचा राजकारणात प्रवेश असे संकेत मिळतात. 

4/7

2013 मध्ये माजी अमेरिकन बास्केटबॉलपटू डेनिस रोडमॅन जेव्हा उत्तर कोरियाच्या भेटीवर आले होते तेव्हा त्यांनी जास्तीत जास्त वेळ किम यांच्या कुटुंबासोबत व्यतीत केला होता. किम यांची मोठी लेक पुढच्या 4-5 वर्षांमध्ये सैन्यात सहभागी होऊ शकते. 

5/7

किम यांच्या पत्नीचं नाव  री सोल-जू आहे. त्यांचा जन्म 28 सप्टेंबर 1989 मध्ये झाला होता. सोल लग्नापूर्वी चिअरलीडर म्हणून काम करत होती असं म्हटलं जातं. सोल आणि किम जोंग यांचं लग्न केव्हा झालं याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पण, 2012 मध्ये अचानकच त्या उत्तर कोरियाच्या शासकांच्या पत्नी म्हणून समोर आल्या. 

6/7

री सोल सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये फारशा दिसत नाहीत. पण, मिसाईल टेस्ट लाँन्चच्या कार्यक्रमात त्यांना पाहून अनेकांनाच धक्का बसला होता. 

7/7

सूत्रांच्या माहितीनुसार किम जोंग उन यांचं लग्न आणि त्यांचं पहिलं मूल 2010 मध्ये जन्मलं होतं. मिसाईल टेस्ट लाँन्चच्या वेळी दिसली, ती त्यांची मोठी मुलगी असल्याचं सांगण्यात येतं.