Bollywood actress With cricketer: बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना निवडलं जीवनसाथी

Bollywood actress Weds with cricketer: बॉलिवूड आणि क्रिकेटचं नातं तसं जुनंच आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटर्सना आपला जीवनसाथी म्हणून निवडला आहे. इतंकच नाही तर अनेक अभिनेत्रींचं नाव क्रिकटर्सशी जोडलं गेलं आहे. स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देण्यासाठीही बॉलिवूड स्टेडिअममध्ये उपस्थित असतं. आज आपण अशाच काही जोड्या पाहाणार आहोत. ( Bollywood actress with cricketer)

| May 27, 2023, 14:04 PM IST
1/7

शर्मिला टॅगोर-मंसूर अली खान पटौदी

हिंदू चित्रपटसृष्टीतील त्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिला टॅगोर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार नवाब मंसूर अली खान पटौदी यांच्याशी लग्न केलं. दोघांच्या कुटुंबियांचा या लग्नाला प्रचंड विरोध होता. पण त्यानंतरही दोघांनी एकमेकांना साथ दिली. शर्मिला टॅगोर आणि पटौदी यांना सैफ अली खान, सोहा अली आणि सबा अली खान ही तीन मुलं आहेत. 

2/7

संगीता बिजलानी-मोहम्मद अजहरुद्दीन

बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी हिने मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केलं. त्याआधी अझरुद्दीनचं पहिलं लग्न झालं होतं. पण संगीताशी लग्न करण्यासाठी त्याने पहिली पत्नी नौरीनला तलाक दिला आणि संगीताशी लग्न केलं. पण अझरुद्दीन आणि संगीताचं नातंही फार काळ टिकलं नाही. त्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.  

3/7

अनुष्का शर्मा – विराट कोहली

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माने आपला लाईफ पार्टनर म्हणून भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची निवड केली. अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न केलं. आता दोघंही आई-बाबा झाले असून त्यांना एक गोंडस मुलगी आहे. 

4/7

हेजल कीच-युवराज सिंह

अभिनेत्री हेजल किच बॉलिवूडमध्ये फारशी कमाल दाखवू शकलेली नाही. पण सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. हेजल किचने टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगश लग्न केलं. या दोघांचं लग्न शिख पारंपारिक पद्धतीने झालं. 

5/7

सागरिका घाटगे-जहीर खान

प्रसिद्ध चित्रपट चक दे इंडिया मधील जबरदस्त भूमिकेने सागरिका घाटगेने प्रेक्षकांच मनं जिंकली. सागरिकानेही आपला जीवनसाथी म्हणून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूचीच निवड केली आहे. सागरिकाने भारताचा वेगवान गोलंदाज झहीर खानशी लग्न केलं. दोघांची जोडी खुपच सुंदर दिसते, अनेक कार्यक्रमात दोघं एकत्र दिसतात. 

6/7

गीता बसरा-हरभजन सिंह

अभिनेत्री गीता बसर आणि भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांच्या अफेअरची चर्चा जोरदार रंगली होती. अखेर या दोघांनी लग्न करत या चर्चांना पूर्णविराम दिला. गीता बसराने बॉलिवूडशिवाय अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. आता दोघं आई-बाबाही झाले आहेत. 

7/7

अथिया शेट्टी आणि केएल राहुल

या यादीतलं सर्वात ताजं नाव म्हणजे अथिया शेट्टी आणि केएल राहुल. बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्गज अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टीने नुकतंच टीम इंडियाचा स्टार सलामीवीर केएल राहुलशी लग्नगाठ बांधली. लोणावळ्यात एका शाही सोहळ्यात या दोघांचं लग्न पार पडलं.