Number 9 Importance : नवरात्री आणि 9 क्रमांकाचा काय संबंध? 'या' मूलांकाचे चमकणार भाग्य

Mulank 9 Importance In Navratri : नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या नऊ रुपांची पूजा करण्यात येते. मूलांक 9 आणि नवरात्रीचा विशेष संबंध आहे. 

Apr 12, 2024, 16:05 PM IST
1/7

वर्षात 4 नवरात्री असतात त्यातील शारदीय आणि चैत्र नवरात्रीला विशेष महत्त्व आहे. चैत्र उत्सवात देवीच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा करण्यात येते. 17 एप्रिलला रामनवीला चैत्र नवरात्रीची सांगता होईल. 

2/7

अंक ज्योतिषशास्त्रानुसार नऊ रुप आणि 9 मूलांक असलेल्या लोकांचा विशेष संबंध आहे. कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक हा 9 असतो. 

3/7

मूलांक 9 असलेल्या लोकांचा शासक ग्रह हा मंगळ असतो. मंगळ हा धैर्य, ऊर्जा, सामर्थ्याचा कारक असतो. या लोकांवर देवी दुर्गाचा विशेष आशीर्वाद असतो. 

4/7

कुंडलीतील मंगळ कमजोर असल्यास तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची आराधना केल्यास फायदा मिळतो. असं म्हणतात पंचमीच्या दिवशी स्कंदमातेची पूजा केल्याने कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होण्यास मदत मिळते. 

5/7

मूलांक 9 चे लोक धैर्यवान, कुशाग्र, बुद्धिमान आणि मेहनती असतात. हे लोक कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास पटाईत असतात. 

6/7

धैर्याने आणि कठोर परिश्रमाने ते आयुष्यात उंच स्थान मिळवतात. ही लोक खूप दानशूर असतात. 

7/7

ही लोक इतरांची मदत करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. एखादी समस्या स्वत:ची समजून पुढे जातात. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)