कोहली आता कायमचा बेंचवर? खणखणीत शतकानंतर 'नंबर 3'बद्दल अय्यर म्हणाला, 'विराट हा फार...'

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot: मागील बऱ्याच काळापासून खराब कामगिरी आणि सातत्याच्या दुखापतीला तोंड देत असलेल्या श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये दमदार शतक झळकावलं. या शतकी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार जिंकल्यानंतर श्रेयसने भारतीय संघातील तिसऱ्या क्रमांकावर विराट खेळत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सूचक विधान केलं आहे. अय्यर काय म्हणाला आहे पाहूयात...

| Sep 25, 2023, 13:38 PM IST
1/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान इंदूरच्या मैदानामध्ये झालेल्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने 99 धावांनी जिंकला. या सामन्यामधील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरला सूर गवसला.

2/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

90 चेंडूंमध्ये 105 धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर त्याने मागील बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या बॅडपॅचबद्दल उघडपणे भाष्य केलं. आपल्या करिअरमधील सध्याच्या चढ उतारादरम्यान आपण एकटेच झगडत होतो अशा अर्थाचं विधान श्रेयसने केलं आहे. 

3/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रीया झाल्याने तो 6 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदूरच्या मैदानामध्ये 5 बाद 399 धावांचा डोंगर उभा केला. यात अय्यरच्या शतकी खेळीचाही समावेस होता. या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर श्रेयसने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. 

4/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

"ही फार मोठी रोलरकोस्टर राइड होती. मी मागील अनेक महिन्यांपासून मेहनत घेत होतो. मी फार एकटा होतो या फेजमध्ये," असं श्रेयसने सामनावीर पुरस्कार जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये म्हटलं.

5/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

याच महिन्यात झालेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरची निवड झाली होती. मात्र त्याला स्पर्धेतून अचानक माघार घ्यावी लागली ती पाठीच्या दुखापतीमुळे. त्याला या स्पर्धेत एकदाच खेळण्याची संधी मिळाली.

6/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

"पुन्हा संघात येऊन छान वाटतंय. ड्रेसिंग रुममधील वातावरण मी एन्जॉय करतोय. मी टीव्हीवर सामने पाहताना आपणही तिथे असावं असं फार वाटायचं," असं श्रेयस अय्यर म्हणाला.

7/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

"माझा स्वत:वर विश्वास असल्याने मला पुनरागमन करता आलं. माझं लक्ष्य काय होतं मला ठाऊक होतं. मला माझ्या नियोजनानुसार कामगिरी करता आली याचा आनंद आहे," असं श्रेयस अय्यर म्हणाला.

8/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

"मी नेट्समध्ये उत्तम फटकेबाजी करत होतो. मी संघाच्या गरजेप्रमाणे वाटेल त्या क्रमांकावर फलंदाजी करायला तयार आहे," असंही श्रेयस अय्यरने सांगितलं.

9/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

ऑस्ट्रेलियन संघाविरोधातील आपल्या नियोजनाबद्दल बोलताना श्रेयस अय्यरने, "मी व्ही शेपमध्ये खेण्याचा प्लॅन केला होता. गोष्टी फार गोंधळलेल्या असू नयेत असं वाटत असल्याने हे असं ठरवलं," असं सांगितलं. 

10/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

सध्याच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये पहिल्या 2 सामन्यासाठी भारतीय संघामधून रोहित शर्मा, हार्दिक पंड्या, विराट कोहली, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराहला बाहेर ठेवण्यात आलं आहे. विश्रांतीसाठी या 5 जणांना बाहेर ठेवण्यात आलं आहे.

11/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

विराटही संघातून बाहेर असल्याने श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली. याचासंदर्भ घेत श्रेयसने, "विराट हा फार महान खेळाडू आहे. मी त्याची जागा (फलंदाजीच्या क्रमवारीतील तिसरा क्रमांका) घेऊन शकेन अशी पुसटशीही शक्यता नाही. मला फक्त मिळेल त्या क्रमाकांवर धावा करण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे," असं सांगितलं.

12/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

श्रेयस अय्यरचा वर्ल्डकपच्या संघामध्ये समावेश आहे. मात्र मूळ संघामध्ये शुभमन गील, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा यासारख्या खेळाडूंचा समावेश असेल तर श्रेयस अय्यरला अनेकदा बाहेर बसावं लागतं असं दिसून आलं आहे.

13/13

Shreyas Iyer On Virat Kohli Number 3 Spot

आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकी खेळीच्या जोरावर संघात निश्चित स्थान मिळेल अशी अपेक्षा श्रेयस अय्यरला आहे. मात्र आपल्याला विराटची जागा घेता येणार नाही याची जाणही श्रेयस अय्यरला असल्याने चाहत्यांनी त्याच्या या प्रमाणिकपणाचं कौतुक केलं आहे.