प्रेमाची संघर्षमय गोष्ट... अपघातात खेळाडूनं गमावला पाय आणि पत्नीही; 9 वर्षांनंतर प्रेमाचं माणूस भेटलं अन्...

Paris Paralympic 2024: "तू वेडा आहेस!" ॲलेसँड्रोने ट्रॅकसाइडवर गुडघे टेकले म्हणून एरियाना उद्गारली. हो तो वेडा आहे तिच्या प्रेमात... कृतज्ञ आहे तिने दिलेल्या आतापर्यंतच्या सोबतीचा...

| Sep 04, 2024, 09:31 AM IST

इटालियन स्प्रिटेंर Alessandro Ossola ने पॅरिस 2024 पॅरालिम्पिकमध्ये एक अतिशय सुंदर गोष्ट केली आहे. तब्बल 40000 लोकांच्या उपस्थितीत त्याने रविवारी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोझ केलं आहे. 36 वर्षीय Alessandro Ossolaने रविवारी केलेल्या या गोष्टीचं जगभरात कौतुक होत आहे. 

T63 100m स्पर्धेत Alessandro Ossola सहभागी झाला होता. सुवर्णपदकाच्या उद्देशाने Alessandro Ossola आपल्या पालकांसाठी आणि गर्लफ्रेंडसाठी धावला. पदरी यश आलं नसलं तरीही त्याने केलेली कृती नक्कीच कौतुकास्पद आहे. 

1/7

नात्यात विश्वास

"आमचं नातं हे एका चढ-उताराप्रमाणे आहे. कारण प्रत्येक ॲथलीटला त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी सतत प्रोत्साहन देणे गरजेचे असते, तिने तेच केलं." "कधीकधी तिचा माझ्यावर इतका विश्वास असायचा जो विश्वास मी पण स्वतःवर ठेवू शकत नाही. आणि हे खरोखरच आश्चर्यकारक आहे. 

2/7

आयुष्यातील अंधकारमय बाजू

Alessandro Ossola ने 2015 मध्ये मोटर सायकल अपघातात आपली पत्नी आणि डावा पाय गमावला. यानंतर तो एक टेक्निकल आर्टिस्ट म्हणून सामान्य जीवन जगत होता. एवढंच ज्याने त्याच्या फावल्या वेळेत असंख्य खेळ खेळले.

3/7

अपघातानंतर मी सगळंच गमावलं होतं, पण...

"खेळाने मला कृती करण्याचा मार्ग दिला आणि अतिशय गडद काळातून बाहेर पडण्याचा मार्ग दिला", अलेसेंड्रो अर्थपूर्णपणे सांगतो. "माझ्या अपघातानंतर, मी खूप काही गमावले. माझ्या जीवनात सगळं काही अंधारमय होतं. काही जण म्हणतील की आजचा दिवस माझ्यासाठी खेळाच्या दृष्टीकोनातून आश्चर्यकारक नव्हता. पण खासगी जीवनात मी खूप काही कमावलं आहे. 

4/7

अशी झाली पहिली भेट

Alessandro Ossola सांगते ती, “माझ्या स्पर्धांदरम्यान ती नेहमी मला फॉलो करते. “मी तिला 2019 मध्ये सॅनरेमो (इटली) येथे एका उन्हाळ्यात भेटलो. जिथे मला फक्त आरामासाठी गेले होतो. अपघातानंतर माझ्या जीवनात सकारात्मक फक्त माझा खेळ होता. 

5/7

खेळ संपला आणि...

ॲलेसँड्रोने असे संकेत दिले आहेत की ट्रॅक पॅरालिम्पियन म्हणून हा त्याचा शेवटचे खेळ आहे. हा क्षण त्याला अतिशय महत्त्वाचा करायचा होता. पण ते खेळात काही शक्य झालं नाही. पण त्याने हा क्षण अतिशय खास बनवला. पॅरिस सारख्या प्रेमाच्या ठिकाणी त्याने मनातील भावना व्यक्त केली. 

6/7

हा खास क्षण

"स्टेड डी फ्रान्स हे मी आतापर्यंत निवडलेले सर्वोत्तम स्थान आहे आणि एरियाना माझ्या जीवनातील अतिशय खास व्यक्ती आहे, त्यामुळे येथे तिला प्रपोझ करताना मला खरोखर आनंद झाला. माझे कुटुंब स्टेडियममध्ये आहे. माझे आई-वडिल आनंदाने आणि अभिमानाने उभे आहेत. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आहेत. माझी गर्लफ्रेंड, टीम सगळेच माज्यासोबत आहेत.

7/7

मला नाही आवडत...

"मला आवडत नाही जेव्हा लोक म्हणतात 'तू अपंग आहेस आणि अरे, तू पॅरालिम्पिकला जात आहेस,'" ओसोलाने सांगितले. "असं नाहीये. जर तुम्ही जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असाल तर तुम्ही पॅरालिम्पिकमध्ये जात आहात. म्हणूनच मला इथे आल्याचा अभिमान वाटतो.”