Paris Fashion Week: रॅम्पवर सिंह, अस्वल आणि लांडग्याची हजेरी; फोटो पाहून व्हाल थक्क

Paris Fashion Week 2023: मॉडल्स अनेकदा आपल्या अतरंगी कपड्यांमध्ये रॅम्प वॉक करताना दिसतात. मात्र यंदाच्या पॅरिस फॅशन वीक 2023 मध्ये एक वेगळं चित्र पहायला मिळालं. या फॅशन शोमधील मॉडल्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

Jan 24, 2023, 21:30 PM IST
1/5

paris fashion week 2023 Wild animal heads

फॅशन शोमधील मॉडेल्सच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्यांचे अतरंगी कपडे हे कायमच चर्चेचा विषय असतात. यंदा पॅरिस फॅशन वीकमध्ये (paris fashion week 2023) असेच हटके स्टाइलचे फॅशनेबल कपडे पहायला मिळाले. यामध्ये अस्वल, लांडगा, चित्त्याबरोबरच अनेक जंगली प्राणीच जणू रॅम्पवर दिसले आणि लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला.

2/5

paris fashion week 2023 Wild animal heads

कोणत्याही फॅशन शोमध्ये अशाप्रकारच्या मॉडल्स तुम्ही फार क्वचितच पाहिल्या असतील. या फॅशन शोमधील कपडे प्राणी या थीमवर डिझाइन करण्यात आले होते. हे कपडे दिसायला विचित्र वाटत असले तरी मॉडेल्सने ते फारच उत्तम प्रकारे कॅरी केले होते. त्यांच्या चालण्यामधूनच आत्मविश्वास झळकत होता.

3/5

paris fashion week 2023 Wild animal heads

काही मॉडेल ड्रेसच्या पुढील भागावर सिंहाचा चेहरा लावून रॅम्पवर उतरल्या तर काहींनी अस्वलाला खांद्यावर घेतल्याप्रमाणे ड्रेस परिधान केला होता. काहींच्या ड्रेसवर लांडग्याचा चेहरा होता. विशेष म्हणजे या कपड्यांवरील प्राण्यांचे चेहरे एवढे छान साकारलेली की खरे प्राणी आहेत की खोटे हे लगेच ओळखू येत नव्हतं.

4/5

paris fashion week 2023 Wild animal heads

सोशल मीडियावर सध्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे. या फोटोंच्या माध्यमातून यंदाचा पॅरिस फॅशन वीक 2023 पुन्हा चर्चेत आला आहे. बरं ही थीम एका विशेष कारणासाठी निवडण्यात आली असून त्याचा साकारात्मक परिणामही दिसून येत आहे.

5/5

paris fashion week 2023 Wild animal heads

जानवरांचे चेहरे असलेले कपडे परिधान करण्यामागील कारण म्हणजे निसर्ग वाचवण्याच्या मोहिमेला दिलेला पाठिंबा आहे. नामशेष होत असलेल्या प्राण्यांच्या संरक्षणासाठी एका मोठ्या मंचावरुन संदेश देण्याचा उद्देश यामागे आहे. सध्या या फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे हे मात्र खरं.