Paris Olympics 2024: मनू भाकरने रचला इतिहास, 'या' खास यादीत नोंदवलं नाव, फक्त तिघांना जमलीये अशी कमागिरी

Manu Bhaker Paris Olympics medal : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने भारताला दुसरं पदक मिळवून दिलंय. 10 मीटर सिंगल पिस्टल प्रकारात मनूने कांस्यपदक जिंकलं होतं. अशातच आता मनूने सरबज्योत सिंग याच्यासह 10 मीटर मिश्र प्रकारात देखील कांस्यपदक पटकावलं.

| Jul 30, 2024, 17:14 PM IST
1/5

कांस्यपदक

अंतिम फेरीत, मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी वोंहो ली आणि ये जिन ओह यांचा 16-10 असा पराभव केला अन् कांस्य पदकावर नाव कोरलं.

2/5

पहिली भारतीय

मनू भाकरने मिश्रमध्ये देखील पदक जिंकून इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली. 

3/5

दिग्ग्जांच्या यादीत मानाचं स्थान

तर ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदक जिंकणाऱ्यांच्या दिग्ग्जांच्या यादीत मनू भाकरने मानाचं स्थान कमवलं आहे. मनूच्या खात्यात एकूण दोन पदकांची नोंद झालीये.

4/5

सुशील कुमार

त्याआधी, कुस्तीपटू सुशील कुमारने 2008 च्या बिजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं. तर 2012 मध्ये सुशीलने रौप्यपदक पटकावलं होतं.

5/5

पीव्ही सिंधू

तर पीव्ही सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावलं होतं.