Sanjay Raut : ...म्हणून संजय राऊतांना धमकी दिली; आरोपीने सांगितली हकीकत

Sanjay Raut : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना शुक्रवारी रात्री जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याच्या नावाने ही धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. संजय राऊत यांनी तक्रार देताच मुंबई पोलिसांनी याप्रकरणी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

Apr 01, 2023, 17:24 PM IST
1/7

Sanjay Raut Death threat

खासदार संजय राऊत यांना शुक्रवारी मोबाईलवर मेसेजद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. दिल्लीत (Delhi) या तुमचाही मुसेवाला (sidhu moose wala) करु अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली होती.

2/7

sanjay raut mumbai police

हिंदू विरोधी, तुम्हाला मारून टाकू, दिल्लीत भेटा सिद्धू मुसेवालाप्रमाणे एके-47 ने मारून टाकू. लॉरेन्सकडून मेसेज आहे. सलमान आणि तुम्ही तयार राहा, असे या मेसेजमध्ये म्हटले होते.

3/7

sanjay raut threat  message

मोबाईलवर मेसेज येताच मुंबई पोलिसांकडे याबाबत तक्रार केली होती. मुंबई पोलिसांनी काही तासांमध्येच संजय राऊत यांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे.

4/7

Rahul Talekar threatening MP Sanjay Raut

खासदार संजय राऊत यांना धमकी देणारा राहुल तळेकर याचा लॉरेन्स बिश्नोई याच्याशी कुठलाही संबंध नसल्याची माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम खराड यांनी दिली आहे. राहुल तळेकर असे धमकी देणाऱ्याचे नाव असून तो पुण्यातील रहिवासी आहे.

5/7

sanjay raut threat call

राहुल तळेकर याचे स्वतःचे हॉटेल आहे. शुक्रवारी रात्री संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर त्याने राऊतांचा नंबर मिळवून त्यांच्यासोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संजय राऊत यांनी फोन उचलला नाही.

6/7

kanjur police

त्यानंतर रागाच्या भरात राहुल तळेकरने संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी दिली. मात्र राहुल तळेकरचा आणि लॉरेन्स बिश्नोईचा कोणताही संबंध नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान मुंबई पोलिसांचे पथक हे राहुल तळेकर याला कांजुर पोलीस ठाण्यात आणून त्याची अधिक चौकशी करणार आहे.

7/7

mumbai police

राहुलने युट्यूबवर सर्फिंग करताना लॉरेन्स बिश्नोईबद्दलची माहिती मिळवली होती. त्यामुळे संजय राऊत यांना धमकी देताना लॉरेन्सचे नाव घेतले. दारूच्या नशेत त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.