PHOTO : रामलल्लासारखा दिसणारा चिमुकला होता सुपरस्टार, धर्मेंद्र - अमिताभला द्यायचा टक्कर; 4 लग्नं 2 अफेअर करुनही...

Entertainment : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या फोटोमधील चिमुकल्याचं रुप अगदी रामलल्लासारखं दिसत आहे. तुम्ही ओळखलं का या अभिनेत्याला?  

Jan 22, 2024, 15:10 PM IST
1/6

या फोटोमधील चिमुकल्याच्या निरागसपणाने सर्वांना भुरळ घातली आहे. हा अभिनेत्या 80 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य करायचा. त्याच्या अभिनयाच्या जोरावर तो अमिताभ बच्चन आणि जितेंद्रसारख्या बड्या कलाकारांनाही टक्कर द्यायचा. 

2/6

ओळखला तुम्ही या अभिनेत्याला? आम्ही तुम्हाला सांगतो, या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमधील चिमुकला आहे विनोद मेहरा. 1950 च्या दशकात बालकलाकार म्हणून त्यांने करिअरला सुरुवात केली होती. 

3/6

विनोद मेहरा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उंची गाठल्या होत्या. या अभिनेत्याने जवळपास प्रत्येक आघाडीच्या अभिनेत्रीसोबत काम केलं होतं. त्याचं वैयक्तिक जीवनही चर्चेत होतं. चार लग्न आणि दोन अफेयर करुनही त्याला खरं प्रेम मिळालं नाही.   

4/6

विनोद मेहरा यांचं नाव त्या काळातील दोन आघाडीच्या अभिनेत्रींसोबत जोडले गेलं होतं. या अभिनेत्याने 1988 मध्ये किरण मेहराशी लग्न केलं. पण ते दोन वर्षच टिकलं. 

5/6

किरण मेहरापासून घटस्फोट घेतल्यानंतर या अभिनेत्याचे नाव रेखासोबत जोडलं गेलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार विनोद मेहरा आणि रेखा यांनी गुपचूप लग्न केलं होतं. 

6/6

रेखासोबतच्या नात्याच्या बातम्यांदरम्यान, हा अभिनेता अभिनेत्री बिंदिया गोस्वामी हिच्या प्रेमात पडला होता. त्यांनी 1980 मध्ये अभिनेत्रीशी लग्न केलं पण तेही लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर 1990 मध्ये या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला.