अप्सरा की परी! बांगलादेश क्रिकेटपटूंच्या पत्नीचं सौंदर्य पाहिलं का? अभिनेत्रीही पडतील फिक्या

बांगलादेश क्रिकेट संघाने (Bangladesh Cricket Team) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) आपली छाप उमटवली आहे. वर्ल्ड कप (World Cup) सारख्या स्पर्धांमध्येही बांगलादेशने मोठमोठ्या संघांना धक्का देण्याची किमया केली आहे. बांगलादेशचे क्रिकेटपटू आक्रमक खिलाडीवृत्तीसाठी ओळखले जातात. पण मैदानाबरोबरच सोशल मीडियावरही (Social Media) ते कायम सक्रिय असतात. आपल्या चाहत्यांसाठी कायम आपले फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीही सौंदर्याच्याबाबतीत (Bangladesh Cricketers Wives) अभिनेत्रींपेक्षा कमी नाहीत.

Feb 21, 2023, 16:26 PM IST
1/10

शाकिब अल हसन

बांगलादेश क्रिकेट संघाचा ऑलराऊंडर आणि कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याच्या पत्नीचं नाव उम्मे अहमद शिशिर असं असून दिसायला ती एखाद्या अप्सरेपेक्षा कमी नाही. उम्मे व्यवसायाने एक मॉडेल आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. उम्मे अहमदने अमेरिकेत आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर पुढचं शिक्षण पूर्ण करताना ती इंग्लंडला असताना तिची ओळख शाकिबशी झाली. दोघांनी डेटिंग सुरु केली आणि 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. आता त्यांना दोन मुलं आहेत. 

2/10

सौम्या सरकार

बांगलादेशचा स्टार खेळाडू सौम्या सरकारच्या (Soumya Sarkar) पत्नीचं नाव प्रियंती देबनाथ पूजा असं आहे. 2020 मध्ये दोघांनी विवाह केला. पांरपारिक बंगाली पद्धतीने त्यांचा विवाह सोहळा पार पडला. प्रियंती बांगलादेशमधल्या तुतपारा इथे राहाणारी आहे. 

3/10

तमीम इक्बाल

बांगलादेशचा आक्रमक फलंदाज तमीम इक्बालची  (Tamim Iqbal) लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नही. तमीमच्या पत्नीचं नाव आयशा सिद्दीकी असं आहे. तमीमने 16 वर्षांचा असताना आयशाला प्रपोज केलं होतं. त्यावेळी आयशाने नकार दिला. पण तमीमने तिचा पिछा सोडला नाही. अखेर आयशाने त्याच्या प्रेमाचा स्विकार केला. त्यानंतर मोठा डेटिंगनंतर 2013 मध्ये दोघांनी लग्न केलं. आता ते दोन मुलांचे आई-बाबा आहेत. 

4/10

महमूदुल्लाह

बांगलादेशचा अष्टपैलू महमूदुल्लाहने (Mahmudullah) लहानपणापासूनची मैत्रीण जन्नुल कवसर मिष्टीबरोबर लग्नगाठ बांधली. 25 जून 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं. ढाकामध्ये हायप्रोफायल विवाहसोहळ्यात बांगलादेशचे दिग्गज सहभागी झाले होते. त्यांना रायद आणि मेयद अशी दोन मुलं आहेत. 

5/10

सब्बीर रहमान

बांगलादेशचा स्टार खेळाडू सब्बीर रहमान (Sabbir Rahman) हा वादग्रस्त खेळाडू म्हणूनओळखला जातो. सब्बीरच्या पत्नीचं नाव अर्पा असं आहे. दोघांनी 2019 मध्ये लग्न केलं. लग्नावेळी अर्पा सेकंड इयरची विद्यार्थिनी होती. 

6/10

मशरफे मुर्तजा

मशरेफे मुर्तजाने (Mashrafe Mortaza) कॉलेजपासून आपल्या पत्नीशी डेटिंग सुरु केलं होतं. त्याच्या पत्नीचं नाव सुमोना हक सुमी असं आहे. दोघंही व्हिक्टोरिया कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांनी 2006 मध्ये लग्न केलं. लग्नानंतर खऱ्या अर्थाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत चढ सुरु झाला. सुमोना उद्योगपती आहे आणि ढाकात फॅशन डिझानर आऊटलेट आहे. 

7/10

मुशफिकुर रहीम

मुशफिकुर रहीमची (Mushfiqur Rahim) प्रेम कहाणीसुद्धा एका चित्रपटाला शोभेल अशीच आहे. एका लग्नात दोघांची ओळक झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये बोलणं सुरु झालं. त्यानंतर अनेक वर्षांनी दोघांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर मुशफिकुर आणि जन्नतुलने 2014 मध्ये लग्न केलं. जन्नतुल उच्च शिक्षित असून तीने बिझनेसची डिग्री घेतली आहे. 

8/10

लिटन दास

बांगलादेशचा आक्रमक युवा फलंदाज लिटन दासने (Litton Das) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अल्पावधीतच आपलं नावाची छाप उमटवली आहे. गेल्या वर्षी लिटन दानने देवश्री विश्वास संचिताशी लग्न केलं. बांगलादेशचा विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून लिटन दासने आपली ओळख निर्माण केली आहे. 

9/10

तस्कीन अहमद

तस्कीन अहमद (Taskin Ahmed) आक्रमक फलंदाजीबरोबरच आपल्या दिसण्याठीही ओळखली जाते. अवघ्या 19 व्या वर्षात त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. लहानपणीची मैत्रिण सैयदा राबेया नईमा हिच्याशी तस्कीनने विवाह केला. 

10/10

रुबेल हुसैन

बांगलादेश वेगवान गोलंदाज रुबेल हुसैनवर (Rubel Hossain) बांगलादेशी अभिनेत्री नाजननी अख्तर हिने शारीरिक हल्ल्याचा आरोप केला होता. त्यामुळे रुबेल हुसैन वादात अडकला होता. पण या आरोपातून रुबेल सहिसलामत सुटला. त्यानंतर 2016 मध्ये रुबेलने इशरत जहां डोलाबरोबर लग्न केलं. लग्नावेळी इशरत दहावीत शिकत होती.