डाळ शिजवताना आलेला फेस शरिरासाठी हानिकारक ? जाणुन घ्या सविस्तर

भारतीय जेवणात डाळींचा वापर प्रामुख्याने केला जातो. कारण डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. डाळ  हा आहारातील अत्यंत आवश्यक घटक असूनदेखील डाळींच्या बाबतीत अजूनही काही लोकांना डाळींचे महत्त्व माहीतच नाही. 

Dec 11, 2023, 18:27 PM IST

भारतीय जेवणात डाळींचा वापर प्रामुख्याने केला जातो. कारण डाळींमध्ये अनेक पोषक घटक असतात. डाळ  हा आहारातील अत्यंत आवश्यक घटक असूनदेखील डाळींच्या बाबतीत अजूनही काही लोकांना डाळींचे महत्त्व माहीतच नाही. 

 

1/7

भारतीयांच्या आहारात डाळी, कडधान्य यांना विशेष महत्त्व आहे. शरिरातील विटॅमिन्स , प्रोटिन्सच्या कमतरतेसाठी, शरिर तंदुरूस्त राहण्यासाठी आहारात डाळी महत्त्वाच्या आहेत. 

2/7

 डाळींना प्रथिनांचा चांगला स्रोत मानलं जातं. अनेक शाकाहारी व्यक्ती प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात डाळींचा समावेश करतात. 

3/7

अनेकांचा असा गैरसमज आहे की, डाळ शिजवताना त्यातून येणारा फेस हा शरिरासाठी हानिकारक आहे.त्यामुळे शरिरातील युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते. 

4/7

एक चिनी म्हण आहे की 'माणूस प्रथम त्याच्या डोळ्यांनी जेवतो',तसचं डाळ शिजवताना फेस राहीला  तर डाळ फारशी चांगली दिसत नाही एवढंच. 

5/7

जर पदार्थात प्युरीनचे प्रमाण जास्त असेल तरचं युरिक अ‍ॅसिडचा धोका होऊ शकतो. डाळीच्या तुलनेत मांसाहारी पदार्थात प्युरीन जास्त असतं. 

6/7

डाळ शिजवताना त्यातील स्टार्च व प्रोटीन बाहेर आल्यामुळे फेस तयार होतो. तुम्ही हेही पाहिलं असेल की जर तो फेस तसाच राहू दिला तर काही वेळाने तो परत डाळीमध्ये  मिसळुन जातो. त्यामुळे तो बिलकुल हानिकारक नसतो. 

7/7

(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)