Tina Dabi पासून Aishwarya Sheoran पर्यंत, या आहेत देशातल्या सर्वात सुंदर IAS अधिकारी

Beautiful IAS Officer : UPSC ची परीक्षा पास करणं हे प्रत्येक हुशार विद्यार्थ्याचं (Student) ध्येय असतं.  वरिष्ठ प्रशासकीय पदांसाठी घेण्यात येणारी ही सर्वात कठीण परीक्षा समजली जाते. दरवर्षी काही मोजकेच तरुण ही परीक्षा पास करुन वरिष्ठ पदावर अधिकारी म्हणून नियुक्त होतात. काही जण आयएएस अधिकारी (IAS Officer) बनतात. यातलेच काही अधिकारी आपली बुद्धीमता आणि आपल्या सौंदर्यामुळेदेखील चर्चेत असतात.  सध्या काही अशा IAS महिला अधिकारी आहेत ज्यांच्या सौंदर्याची चर्चा देशभरात होतेय. त्यांचे फोटोज सोशल मीडियावर व्हायलर होत असतात. इतकंच काय त्यांचे लाखो फॉलोअर्सदेखली आहेत.

Mar 13, 2023, 21:14 PM IST
1/5

IAS Tina Dabi

जैसलरमेरच्या कलेक्टर टीना डाबी या ना त्या कारणाने दररोज वर्तमान पत्रात झळकत असतात. 2015 मध्ये टीना डाबी युपीएससी परीक्षेत टॉप आल्या होत्या. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या यशाची चांगलीच चर्चा झाली. इतकंच नाही तर त्यांच्या सौंदर्यामुळेही त्या सोशल मीडियावर चर्चेत असतात. त्यांचे पती प्रदीप गावंडे हे देखील IAS अधिकारी आहेत. प्रदीप हे टीना यांचे दुसरी पती. पहिले पती अतहर आमिर खान हे देखील IAS अधिकारी आहेत. 

2/5

IAS Officer Riya Dabi

IAS अधिकारी टीना डावी यांच्या लहान बहिण रिया डाबी या देखील IAS आहेत. त्या राजस्थानमधल्या कॅडरमध्ये नियुक्त असून रिया या देखील टीना डाबी यांच्यासारख्याच सुंदर आणि बुद्धीमान आहेत. रिया डाबी यानी 2020 युपीएससी परीक्षेत पंधरावा क्रमांक पटकावला होता. त्याही सोशल मीडियावर चांगल्याच चर्चेत असतात.

3/5

IAS Officer Aishwarya Sheoran

ऐश्वर्या शेरॉन यांनी पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परीक्षा पास केली होती. त्या राजस्थान जिल्ह्यातल्या चूरु जिल्ह्यात राहाणाऱ्या आहेत. युपीएससी परीक्षेत पास होण्यासाठी ऐश्वर्या यांनी मॉडलिंग्या करिअरवर पाणी सोडलं होतं. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 93 वा क्रमांक पटकावला. 2014 मध्ये ऐश्वर्या शेरॉन यांनी क्लीन अँड क्लीअर फेस फ्रेश स्पर्धेत अंतिम यादीत प्रवेश केला होता. तर 2016 मध्ये त्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर होत्या. देशातल्या सुंदर IAS अधिकाऱ्यांपैकी ऐश्वर्या शेरॉन या एक आहेत. 

4/5

IAS Srushti Deshmukh

IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांनीही पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली होती. त्यांनी 5 वी क्रमांक पटकावला होता. 2018 UPSC CSE च्या त्या सर्वश्रेष्ठ महिला राहिल्या आहेत. IAS सृष्टि देशमुख यांनी IAS नागार्जुन गौडा यांच्याशी लग्न केलं. मजेची गोष्ट म्हणजे दोघंही एकाच वर्गात होते. 

5/5

IAS Officer Pari Bishnoi

राजस्थानमध्ये राहाणाऱ्या परी बिश्नोई या 2019 यूपीएससी परीक्षेतील टॉपर आहेत. त्यांनी तिसावा क्रमांक मिळवला होता. आपल्या यशाचं श्रेय त्या आपल्या आईला देतात. IAS परी बिश्नोई सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. आपल्या अॅक्टिव्हिजेचे फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करत असतात.