SBIच्या ग्राहकांसाठी खूशखबर; 'ही' कार घेतल्यास घरी होणार फ्री चार्जर इंस्टॉल

 ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी SBIने ही ऑफर दिली आहे. 

Aug 31, 2020, 14:09 PM IST

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India)ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही TATA कंपनीची इलेक्ट्रिक कार खरेदी करत आहात तर तुमच्या घरी फ्री चार्जर इंस्टॉल करण्यात येणार आहे. ऑटो लोनकरीता ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी SBIने ही ऑफर दिली आहे. 

 

1/4

Tata Nexon EV

Tata Nexon EV

जर तुम्ही Tata Nexon EV ही कार विकत घेत आहात तर तुम्हाला घरी फ्री चार्जर इंस्टॉल करून देण्यात येईल. अशी माहिती SBIने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. 

2/4

घरात असेल चार्जिंगची सुविधा

घरात असेल चार्जिंगची सुविधा

इलेक्ट्रिक कारची बॅटरी चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशनवर जाण्याची गरज भासते. परंतु ही कार जर तुम्ही खरेदी कराल तर तुम्हाला घरातल्या घरात बॅटरी चार्ज करता येईल.   

3/4

७.५० टक्के व्याज दरात वाहन कर्ज उपलब्ध

७.५० टक्के व्याज दरात वाहन कर्ज उपलब्ध

आपणास केवळ ७.५० टक्के व्याज दराने वाहन कर्ज देण्यात येत आहे. तात्काळ कर्ज मिळवण्यासाठी तुम्ही SBIYONO च्या माध्यमातून अर्ज भरू शकता  

4/4

असा करा अर्ज

असा करा अर्ज

Tata Nexon EV या कारची बुकिंग करण्यासाठी तुम्हाला YONO ऍपवर login करावं लागेल. ऑटोमोबाईल पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर टाटा मोटर्सवर  (Tata Motors) क्लिक करून Tata Nixon EVची निवड करा.