गोष्ट पैशांची ! महिन्याला 15 हजार कमवण्यासाठी YouTube चॅनेलवर किती Subscribers हवेत? जाणून घ्या...

YouTube Money : गुगलनंतर (Google) यूट्यूब ही जगात दुसऱ्या नंबरची सगळ्यात जास्त बघितली जाणारी वेबसाईट (Web Site) आहे. भारतात अनेक जण युट्यूब (YouTube)  वापरतात. युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन तुम्ही चांगली कमाई करु शकता. यूट्यूबवरुन पैसे कमावणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण यासाठी तुम्हाला थोडीशी आणि कल्पक व्हिडिओ तयार करावे लागतील. आता तुम्ही विचार करत असाल की YouTube Users या अॅपमधून पैसे कसे कमवतात? यासाठी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पाच महत्वाचे मार्ग.

Jan 18, 2023, 13:41 PM IST
1/5

YouTube वर पैसे मिळायला सुरुवात होण्यासाठी तुमच्या चॅनेलवर Monetisetion सुरु होणं गरजेचं आहे. ते सुरु होण्यासाठी तुमच्या चॅनेलवर कमीत कमी 1 हजार सब्सक्राईबर्स (Subscribers) आणि 4 हजार Public Hour Views असावे लागतात. यानंतरच गूगल तुम्हाला जाहीरातीद्वारे पैसे देण्यास सुरुवात करतो. 

2/5

YouTube तुमच्या चॅनेलला 1 हजार सब्सक्राईबर्स आणि 4 हजार Public Hour Views मिळाले आहेत की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला YouTube Studio ची मदत होते. तुम्ही तुमच्या अकाऊंटमधून ब्राउझरद्वारे किंवा अॅप डाउनलोड करून ही माहिती एक्सेस करु शकता.

3/5

हे फिचर सुरु झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळतायत यावरुन पैसे मिळायला सुरुवात होते. म्हणजे जास्त जितके जास्त व्ह्यूज तितकी जास्त कमाई. मग सब्सक्राईबर किती आहेत हे महत्त्वाचं ठरत नाही. तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आहेत आणि त्यात गूगलद्वारे जाहीरात दिली जात असेल तरी तुमच्या अकाऊंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होते. 

4/5

यासाठी तुम्हाला चांगला कंटेंट द्यावा लागेल. म्हणजेच तुम्ही सातत्याने चांगला कंटेंट देत असाल तर महिन्याला 15 हजाराहून अधिक कमाई तुम्ही करु शकता. पण यासाठी तुम्ही तयार केलेला व्हिडिओ तितकाच चांगला असायला हवा.

5/5

याशिवाय युट्यूबवर पैसे कमवण्याचे आणखी पर्याय आहेत. तुमच्या चॅनलची मेंबरशीप ऑफर, सुपर चॅट्स, सुपर स्टिकर्स आणि युट्यूब प्रीमिअम द्वारेही पैसे कमावले जाऊ शकतात. शिवाय तुमच्या व्हिडिओजला व्ह्यूज जास्त मिळत असतील तर अनेक कंपन्या तुम्हाला जाहीराती देतात, कमाईचा हा एक मोठा हिस्सा आहे.