Photos: चमकणारा लोगो, ऐसपैस जागा अन्... Auto Expo 2023 मध्ये Tata Harrier EV ची चर्चा

Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023: ईव्ही क्षेत्रामध्ये टाटा कंपनी मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करत असून त्याचीच झलक सध्या दिल्लीत सुरु असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये दिसून आली.

Jan 12, 2023, 15:09 PM IST

Tata Harrier EV At Auto Expo 2023: ऑटो एक्सपो २०२३ मध्ये टाटा मोटर्सच्या हॅरियर एसयूव्हीचं ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रॉनिक व्हर्जन सादर केलं. या गाडीच्या माध्यमातून टाटा ग्रुपने (TATA Group) ईव्ही क्षेत्रामधील आपली भविष्यातील वाटचाल कशी असेल याची झलक दाखवल्याचं सांगितलं जात आहे. पाहूयात या गाडीचे काही खास फोटो...

1/5

Photos of Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023 Check Features and Specification

नव्या टाटा हॅरियर ईव्हीला कंपनीच्या 'बॉर्न इलेक्ट्रिक' प्लॅटफॉर्मवर डिझाइन करण्यात येणार आहे. ही गाडी टू आणि थ्री रो सिटींग कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध असेल. यामध्ये रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत ईव्हीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.  

2/5

Photos of Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023 Check Features and Specification

नव्या टाटा हॅरियर ईव्ही कनसेप्टचा फ्रंट आणि रेअर दोघांमध्येही 'टी' लोगो दिसत असून हा ग्लो होणार लोगो आहे. हा लोगो चमकताना अधिक आकर्षक वाटतो. हा लोगो टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबॅलिटी (टीपीईएमएल) सेगमेंटमधील गाड्यांसाठीचा नवा लोगो आहे.  

3/5

Photos of Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023 Check Features and Specification

टाटा कंपनीने अद्याप या ईव्ही कनसेप्ट कारच्या इंटीरियरसंदर्भात खुलासा केलेला नाही. या गाडीमध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञान, पूर्ण कनेक्टिव्हिटी आणि ऑटो असिस्टसारखे फिचर्स देण्यात येणार आहेत. या गाडीचा इंटरनल लेआऊट लाउंजसारखा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

4/5

Photos of Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023 Check Features and Specification

टाटाच्या डेडिकेटेड जेन थ्री (बॉर्न इलेक्ट्रिक) आर्किटेक्चरनुसार या गाडीची रचना असेल. त्यामुळेच आईसी इंजिन बेस प्लॅटफॉर्मच्या पॅकेजिंग आणि डिझाइनसंदर्भातील अडचणी या गाडीच्या रचनेत दिसणार नाहीत. टाटा हॅरियर ईव्हीचं फायनल प्रोडक्शन मॉडल 2025 पर्यंत येऊ शकतं.

5/5

Photos of Tata Harrier EV unveiled At Auto Expo 2023 Check Features and Specification

ईव्ही क्षेत्रामध्ये टाटा कंपनीने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. टाटा समुहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी येणाऱ्या कालावधीमध्ये देशात वेगाने इलेक्ट्रॉनिक वाहन क्षेत्रात बदल दिसून येतील अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळेच टाटा समूह सुद्धा या गाड्यांच्या निर्मितीसंदर्भातील गुंतवणूक वाढवताना दिसत आहे.