'ती' 72 कोटींची संपत्ती जमवून वयाच्या 12 व्या वर्षीच निवृत्त; असं काय काम करायची चिमुकली?

Who is Pixie Curtis : वयाच्या बाराव्या वर्षी ही मुलगी काय करतेय ते पाहून हैराण व्हाल...   

Aug 02, 2023, 12:53 PM IST

Who is Pixie Curtis : काही मुलं कमी वयातच इतकी हुशार असतात, की त्यांच्या हुशारीचं प्रमाण देणारे प्रसंग आपल्याला हैराण करून जातात. सध्या संपूर्ण जगभरात अशाच एका मुलीची चर्चा अधुनमधून होत असते. 

 

1/9

Pixie Curtis

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

Who is Pixie Curtis : एखाद्या 12 ते 13 वर्षांच्या मुलीसाठी भेटवस्तू न्यायचीये.... काय बरं न्याव? असा प्रश्न विचारला असता एखादा छानसा Game, छानसा Dress किंवा त्या वयोगटाला साजेशी एखादी भेटवस्तू आपण पर्याय म्हणून सुचवतो.   

2/9

व्यवसायाची मालकीण

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

संपूर्ण जगातून एक मुलगी मात्र या साऱ्याला अपवाद ठरत आहे. कारण, तिच्याकडे इतक्या कमी वयात अनेक सुखसोयी आहेत. खेळण्याबागडण्याच्या या वयात तिच्या नावे कोट्यवधींची संपत्ती आहे. इतकंच नव्हे, तर ती एका व्यवसायाची मालकीण आहे. 

3/9

विश्वास बसत नाहीये?

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

विश्वास बसत नाहीये? या मुलीचं नाव आहे पिक्सी कर्टीस. परदेशात सुट्टीसाठी जाणं म्हणू नका किंवा मग आलिशान जीवनशैली म्हणू नका. पिक्सीच्या जीवनात असणाऱ्या सुखसोयी पाहून अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो.   

4/9

चाईल्ड इन्फ्लुएंसर

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

पिक्सीची कंपनी मुलांची खेळणी, कपडे आणि इतर गोष्टींचं उत्पादन आणि विक्री करते. इतक्या कमी वयात प्रसिद्धीझोतात आलेली पिक्सी एक सोशल मीडिया चाईल्ड इन्फ्लुएंसर आणि सोशल मीडिया स्टार आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या पिक्सीच्या सर्व पोस्ट तिची आई, रॉक्सी हाताळते.   

5/9

इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स...

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

पिक्सी सोशल मीडियावर इतकी सक्रिय आहे, की एकट्या इन्स्टावर तिचे 142K फॉलोअर्स आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे वयाच्या 12 व्या वर्षी पिक्सीच्या संपत्तीचा आकडा 72 कोटींहूनही जास्त आहे. 

6/9

लॉकडाऊन काळात सुरु केली कंपनी

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

ती ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय PR Guru रॉक्सी जेंसेक यांची लेक आहे. पिक्सीनं लॉकडाऊन काळात एक कंपनी सुरु केली आणि पाहता पाहता ती कोट्यवधींच्या व्यवसायाच्या शर्यतीत मजल मारताना दिसली. 

7/9

पिक्सीनं निवृत्तीचा निर्णय घेतला

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

आता मात्र पिक्सीनं निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार येत्या काळात ती शिक्षणावर लक्ष केंद्रीत करू इच्छिते. ज्यामुळं आता सक्रिय व्यवसायातून तिनं काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

8/9

महिन्याला किती रुपये कमवते ?

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

पिक्सी महिन्याला किती रुपये कमवते असा प्रश्न तुम्हालाही पडत असल्यास ती, एका महिन्याला साधारण एका महिन्याहून जास्त पैसे कमवते. इतकंच नव्हे तर, तिच्याकडे स्वत:च्या मालकीचा एक बंगलाही आहे.   

9/9

अपेक्षांचं ओझं नाही.

pixie curtis a girl with 72 crore wealth announces retirment

महत्त्वाची बाब म्हणजे प्रसिद्धी आणि श्रीमंती या दोन्ही गोष्टींची कमतरता नसणाऱ्या पिक्सीवर तिच्या आईवडिलांनी कोणत्याही प्रकारच्या अपेक्षांचं ओझं लादलेलं नाही. पण, जीवनात योग्य वेळ येताच काही गोष्टींना अल्पविराम द्यायचा असतो हाच संदेश तिच्या निवृत्तीच्या निर्णयातून सर्वांपर्यंत पोहोचला हेसुद्धा तितकंच खरं.