PM Modi Birthday : शून्यापासून शिखरापर्यंत! पंतप्रधान मोदींचे न पाहिलेले फोटो आणि Unknown Facts

#HappyBdayModiJi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगरमध्ये झाला. वाढदिवस निमित्त मोदी आज भारतीयांना तीन गिफ्ट देणार आहेत. 

Sep 17, 2023, 08:27 AM IST

#HappyBdayModiJi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमत्त आज ते यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन (Yashobhoomi Convention Centre), पीएम विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन(Vishwakarma Scheme) आणि दिल्ली विमानतळ मेट्रो लाइन विस्ताराचे उद्घाटन (Metro Inauguration) ते करणार आहेत. 

1/13

जगात सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते म्हणून त्यांना देश विदेशात प्रचंड लोकप्रियता आहे. नुकताच झालेल्या ग्लोबल लीडर्स अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकरच्या सर्वेक्षणात मोदी यांची जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. 

2/13

पंतप्रधान मोदींची राजकारणातील सुरुवात वयाच्या 8 व्या वर्षी झाली.  लक्ष्मणराव इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली RSS ज्युनियर कॅडेट म्हणून त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली. लक्ष्मणराव इनामदार हे त्यांचे गुरू आहेत.

3/13

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, तरुणपणी पंतप्रधान मोदींना संत बनण्याची इच्छा होती. त्यांनी जवळजवळ दोन वर्षे हिमालयात एकांतात वेळ घालवला होता. जिथे त्यांनी ध्यान करत हिंदू धर्माचं तत्वज्ञान स्वीकारलं.

4/13

नरेंद्र मोदी 2001 मध्ये  गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, तेव्हा त्यांना विधानसभेत एकही जागा नव्हती.

5/13

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 1947 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले भारतीय पंतप्रधान म्हणून मान मिळाला. 

6/13

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचनाची आणि कविता करण्याची आवड आहे. त्यांनी गुजरातमध्ये अनेक कविता लिहिल्या आहेत.

7/13

पंतप्रधान मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा 13 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी एक दिवसही सुट्टी घेतली नव्हती. 

8/13

पंतप्रधान मोदींच्या विशिष्ट फॅशन सेन्सनेमुळे आयकॉनिक मोदी जॅकेट आणि मोदी कुर्ताला त्यांना जागतिक फॅशन आयकॉन म्हणून ओळख मिळवून दिली.अहमदाबादचा 'जेड ब्लू' हा त्यांचा आवडता ब्रँड आहे.   

9/13

इंदिरा गांधींनंतर सलग दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत.

10/13

पंतप्रधान मोदी ही   सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील सर्वात लोकप्रिय जागतिक नेत्यांपैकी एक आहेत. मोदींचे X (पूर्वीचे ट्विटर) वर सुमारे 92 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.  

11/13

शालेय जीवनात पंतप्रधान मोदींना रंगभूमीची आवड होती.   

12/13

मोदींच्या एका सवयीमुळे त्यांचे कुटुंब खूप त्रस्त होते. ते न सांगता अनेक वेळा कुटुंब सोडून महिनोमहिने गायब व्हायचे. 

13/13

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर मोदी औपचारिकपणे RSS मध्ये सामील झाले. 1974 मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांनी भूमिगत राहून जनतेची सेवा केली.