पीएम मोदींचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान, फोटोच्या माध्यमातून जाणून घ्या पंतप्रधानांचा संपूर्ण पुणे दौरा

PM Modi in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांचा आज लोकमान्या टिळक पुरस्काराना (Lokmanya Tilak Award) सन्मान करण्यात आला. लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पीएम मोदी यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने पीएम मोदी आज पुणे (Pune) दौऱ्यावर होते. आपल्या दौऱ्यात पुरस्काराबरोबर पीएम मोदी यांनी पुण्यातील विविध लोककामांचंही उद्घाटन केलं. तसंच पुण्यातील प्रसिद्ध दगडू शेठ गणपतींच दर्शन घेतलं.

| Aug 01, 2023, 16:29 PM IST
1/11

नियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 10.40 मिनिटांनी पुणे विमानतळावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल रमेश बैस यांच्यासह मुख्यंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. 

2/11

3/11

विमानतळावरून मोदी हेलिकॉप्टरमधून पुणे शहरातील सिंचन नगर इथल्या हेलिपॅडवर दाखल झाले. त्यानंतर पीएम मोदी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेळ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी रवाना झाले.

4/11

पंतप्रधान नरेंद्र मोदी दगडूशेठ गणपती मंदिराकडे कारने मार्गस्थ झाले. यावेळी मोदींना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांकडून गणपती बाप्पाचां जयघोष करत मोदी-मोदी अशा घोषणा देखील देण्यात येत होती. मोदी यांनी हात जोडून जनतेचं अभिवादन स्विकारलं.

5/11

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेतलं आणि पूजा केली. सकाळी अकराच्या सुमाराला मोदी दगडूशेठ मंदिरात दाखल झाले. मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. दगडूशेठ हलवाई मंदिरानं गणपतीच्या मूर्तीची प्रतिकृती देत मोदींचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर मोदींनी मंत्रोच्चारात गणरायाची पूजा केली. 

6/11

गणपतीच्या चांदीच्या मूर्तीला त्यांनी अभिषेक केला. विधिवत पूजा झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पंचारती ओवाळत गणरायाची आरती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे दौऱ्यादरम्यान दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं. मंदिरात दगडूशेठची पूजा करत आरती केली. यावेळी त्यांनी भारत हा विश्वगुरू व्हावा आणि चंद्रयान 3 ला यश मिळावं असा संकल्प केला.

7/11

दगडूशेठ मंदिरात पूजा आणि आरती केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कर सोहळ्यासाठी रवाना झाले पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानात मुख्य कार्यक्रम होता. लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी मंचावर आले आणि त्यांनी पवारांची भेट घेतली. मोदी आणि पवारांनी एकमेकांशी हसून बोलले. पंतप्रधानांनी मंचावर शरद पवारांची भेट घेतली. दोघांनी आधी एकमेकांना नमस्कार केला. मग दोघांनी हस्तांदोलन केलं....त्यानंतर मोदी शरद पवारांशी काहीतरी हास्यविनोद करत बोलले. त्याला शरद पवारांनीही हसून दाद दिली. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या खांद्याला हात धरुन त्यांच्याशी संवाद साधला त्यानंतर पवारांनी मोदींच्या पाठीवरही थाप मारली. 

8/11

त्यानंतर पीएम मोदींचा लोकमान्य टिळक पुरस्कारानं गौरव करण्यात आला. लोकमान्य टिळक संस्थेचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते मोदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, पुणेरी पगडी आणि एक लाख रुपयांची रक्कम असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. यातली एक लाख रुपयांची रक्कम पंतप्रधान मोदींनी नमामी गंगे या प्रकल्पाला दान केलीय. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शरद पवार, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. पुण्यासारख्या विद्वत्तेच्या शहरात अशा पुरस्कारानं गौरव होणं हे मोठं भाग्य असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदींनी पुरस्काराचा स्वीकार केला. 

9/11

पुण्यातल्या आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींनी नामांतरावरुन टोला लगावला.. आम्ही रस्त्याचं नाव बदललं, परकीय आक्रमकाऐवजी स्वदेशी नाव ठेवलं.. तरी हंगामा होतो.. काही जणांना झोप लागत नाही.. असा टोला पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लगावला. आम्ही रस्त्याचं नाव बदललं तरी हंगामा होतो''परकीय आक्रमकाऐवजी स्वदेशी नाव ठेवलं तर त्यांना झोप लागत नाही असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

10/11

कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान मोदी मंचावर सगळ्या नेत्यांना अभिवादन करत होते, नमस्कार करत होते.. मंचावरुन उतरण्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनाही मोदींनी नमस्कार केला. त्यावेळी मोदींनी शिंदे आणि फडणवीसांना नमस्कार केला. अजित पवारांना खांद्यावर थापही मारली. मोदींनी अजित पवारांच्या खांद्यावर मारलेली ही थाप लक्षवेधी ठरली... 

11/11

त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचं लोकार्पण करण्यात आलं.. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी कोर्ट तसंच गरवारे ते रुबी हॉल क्लिनीक मार्गिकांचं लोकार्पण करण्यात आलंय.. पंतप्रधान आवास योजनेतील घरांचं लोकार्पणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं.. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं बांधलेली 1280 घरं तसंच पुणे महापालिकेनं बांधलेली 2650 घरांचं लोकार्पण मोदींनी केलं.. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणीही मोदींच्या हस्ते झाली..