काझीरंगा पार्कमध्ये पंतप्रधान मोदींची जंगल सफारी; हत्तीवर झाले स्वार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज पहाटे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात पोहोचले होते, जिथे त्यांनी हत्तीची सफारी आणि जीप सफारी केली.

Mar 09, 2024, 10:44 AM IST
1/7

PM Modi Assam Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाम दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाला भेट दिली. यावेळी त्यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात हत्तीची सफारीही केली.

2/7

pm modi safari ride on elephant

पंतप्रधान मोदी शनिवारी सकाळी आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पात पोहोचले. तिथे पंतप्रधान मोदी हत्ती आणि जीपवर स्वार झाले.  

3/7

Kohora Range

पंतप्रधान मोदींनी आधी उद्यानाच्या सेंट्रल कोहोरा रेंजमधील मिहिमुख परिसरात हत्तीवरुन सफारी केली. यानंतर त्यांनी याच रेंजमध्ये जीप राईडचा आनंदही घेतला.

4/7

PM Narendra Modi

यावेळी पंतप्रधान मोदींसोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका सोनाली घोष आणि इतर वरिष्ठ वन अधिकारीही होते.

5/7

security arrangements before Prime Minister Modi reaches Kaziranga

पंतप्रधान मोदी काझीरंगा येथे पोहोचण्यापूर्वी सर्व सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जवळपास 2 तास थांबले होते

6/7

kaziranga national park rhino

काझीरंगा नॅशनल पार्क हे एक शिंगे असलेल्या गेंड्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्यांना पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. याशिवाय हत्ती, म्हशी, हरीण आणि वाघ पाहण्याचीही संधी आहे.

7/7

statue of valor

मुघलांचा पराभव करणाऱ्या आसामच्या अहोम राज्याच्या शाही सैन्यातील प्रसिद्ध सेनापती लचित बोरफुकन यांच्या भव्य पुतळ्याचे पंतप्रधान 'स्टॅच्यू ऑफ वेलोर'चे अनावरण करतील.