काळी टोपी, खाकी पँट अन् प्रिंटेड टी शर्ट... जंगल सफारीसाठी पंतप्रधानांचा खास लूक

PM Modi Jungle Safari : कर्नाटकातील म्हैसूर-उटी महामार्गावरील उंच पश्चिम घाटाच्या नयनरम्य परिसरामध्ये स्थित, बांदीपूर व्याघ्र प्रकल्प हा निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा एक महत्त्वाचा भाग आहे. म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इथे भेट दिली.

Apr 09, 2023, 12:42 PM IST
1/6

PM Narendra Modi

म्हैसूरच्या प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांचा एक भाग म्हणून पंतप्रधान रविवारी कर्नाटकातील बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात सफारीला गेले होते. यावेळी पीएमओने पंतप्रधान मोदींचा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये ते 'सफारी' पोशाखात टोपी घातलेले दिसत आहेत. (सर्व फोटो सौजन्य - ANI)

2/6

PM went on a safari at the Bandipur Tiger Reserve

बांदीपूर व्याघ्र प्रकल्प चामराजनगर जिल्ह्यातील गुंडलुपेट तालुक्यात आणि अंशतः म्हैसूर जिल्ह्यातील एचडी कोटे आणि नांजनगुड तालुक्यातील काही भागात स्थित आहे.

3/6

50 Yrs of Project Tiger

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्याघ्र गणनेच्या अहवालाचं प्रकाशन केलं जाणार आहे. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते प्रोजेक्ट टायगरच्या सुवर्ण महोत्सवाबाबत एका कार्यक्रमाचं उद्घाटन केलं जाणार आहे. 

4/6

PM Modi Jungle Safari

पंतप्रधानांनी संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फील्ड स्टाफ आणि कर्मचाऱ्यांच्या गटांशी देखील संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी डोंगराळ निलगिरी जिल्ह्यातील मुदुमलाई येथील हत्तींच्या छावणीलाही भेट दिली.  

5/6

PM Modi New Look

2019 मध्ये, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील बेकायदेशीर व्यापार आणि वन्य प्राण्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी जागतिक नेत्यांची आघाडी स्थापन करण्याचे आवाहन केले होते.

6/6

Bandipur Mudumalai Reserves

19 फेब्रुवारी 1941 रोजी सरकारी अधिसूचनेनुसार स्थापन करण्यात आलेल्या पूर्वीच्या वेणुगोपाल वन्यजीव उद्यानातील बहुतांश वनक्षेत्र ताब्यात घेऊन राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती करण्यात आली. विभागानुसार, या राष्ट्रीय उद्यानाचा विस्तार 1985 मध्ये करण्यात आला होता, त्यामुळे त्याचे क्षेत्रफळ 874 चौरस किलोमीटरपर्यंत वाढले आहे.