...कारण माझ्याकडे पर्याय नव्हता; वर्ल्डकपमध्ये कपडे काढण्याच्या वक्तव्यावर पूनम पांडेचा खुलासा

Poonam Pandey : अभिनेत्री पूनम पांडे आज 31 वर्षांची झाली आहे. अभिनेत्री पूनम पांडे ही तिच्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे कायम चर्चेत असते. मात्र काही वर्षांपूर्वी तिने केलेल्या एका घोषणेमुळे पूनम पांडेने सगळ्यांचेच लक्ष्य वेधून घेतले होते. त्याच घोषणेसंदर्भातील एका मुलाखतीचा व्हिडीओ पूनम पांडेच्या वाढदिवसानिमित्त व्हायरल होत आहे.

Mar 11, 2023, 09:39 AM IST

Poonam Pandey : पूनम पांडे 2011 मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती, जेव्हा तिने भारतात चालू असलेल्या क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान जर भारताने विश्वचषक जिंकला तर कपडे काढून टाकेल असे म्हटले होते. या घोषणेनंतर अनेकांची धाकधूक वाढली होती. मात्र आता त्यावेळी नक्की काय झालं याबाबत पूनम पांडेने 'रेडिओ मिर्ची'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

 

1/6

poonam pandey interview

व्हायरल झालेल्या मुलाखतीमध्ये पूनम पांडेने भारतीय संघाने आयसीसी 2011 विश्वचषक जिंकल्यास कपडे काढून टाकेल, या धक्कादायक घोषणेबाबत भाष्य केले आहे.    

2/6

Poonam Panday on world cup controversy

भारतीय संघाने विश्वचषक जिंकल्यानंतर तिच्या घरी काय परिस्थिती होती आणि तिने दिलेले वचन पूर्ण करण्यावर सर्वांचे लक्ष लागले होते याबाबत पूनमने या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

3/6

Poonam Panday controversy

"मी तेव्हा १८ वर्षांची होते आणि विचार करत होते की मला आयुष्यात काय करायचं आहे? त्यावेळी ठरवलं की काहीतरी मोठे करूया. मी क्रिकेट चालू असल्याचे पाहिलं, मस्त, अख्खा देश क्रिकेट पाहतो. मला क्रिकेटचे ज्ञान अजिबात नाही. क्रिकेटपटूंची नावे माहीत नाहीत. मला काही कळत नाही, पण मला काहीतरी करायचं होतं," असं पूनमने सांगितलं.

4/6

poonam panday team india

मला काहीतरी करायचं होतं. तेव्हा वाटलं एक मोठं विधान देऊन टाकूया ज्याने भारत हादरून जाईल. त्यानंतर मी ती घोषणा करुन टाकली आणि भारताने सामना जिंकलाही.

5/6

poonam pandey Mom Dad Reactions

यानंतर मी घाबरले, आता मला ते करावेच लागेल. दुसरीकडे माझ्या घरी नाटक सुरू आहे. माझी आई मला मारत होती, माझे बाबा ओरडत होते तू हे काय केलेस म्हणून वगैरे...

6/6

poonam pandey statement

"मी याबद्दल कधीच बोलले नाही. मला कोणी ओळखत नाही. पण सर्वाना हेच माहिती आहे की मी कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन जिला नेहमीच आपल्या शरीराचे प्रदर्शन करणे आवडते. होय मी केले कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी तिथपर्यंत कसे पोहचू शकते हा विचार करताना हा एकच पर्याय माझ्या मनात आला. मी ही संधी साधली कारण मला इतरांसारखी तडजोड करायची नव्हती," असे स्पष्टीकरण पूनम पांडेने दिले.