प्रिती झिंटाने घेतली धर्मगुरु दलाई लामा यांची भेट; सोशल मिडियावर शेअर केले फोटो
प्रिती झिंटाने धर्मशाला येथे दलाई लामा यांची भेट घेतली. प्रितीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
Preity Zinta Meet Dalai Lama : बॉलिवूडची डिंपल गर्ल अशी ओळख असलेली अभिनेत्री प्रिती झिंटा (Preity Zinta ) सध्या चित्रपटांपासून लांब आहे. मात्र, IPL टीम आणि तिच्या पर्सनल लाईफमुळे ती नेहमीच चर्चेत असते. प्रिती झिंटाने धर्मगुरु दलाई लामा (Dalai Lama) यांची भेट घेतली. यावेळी तिचा पती जीन गुडएनफ (Gene Goodenough) देखील तिच्या सोबत होता. या भेटीचे फोटो प्रिती झिंटाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.