प्रियंका चोप्राच्या भावाचा तिसऱ्यांदा साखरपुडा, दोन वेळा तुटलं नातं, आता 'या' साऊथ अभिनेत्रीचा धरला हात

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आणि अभिनेत्री नीलम यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. 

| Aug 27, 2024, 14:01 PM IST

Sidharth Chopra Neelam Upadhyay Engagement : बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत ग्लोबल ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि तिचं संपूर्ण कुटूंब सध्या चर्चेत आहे. याला कारण आहे प्रियंकाचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा आपली गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री नीलम उपाध्यायसोबत साखरपुडा करत आहे. सिद्धार्थच्या आनंदात सहभागी होण्यासाठी प्रियंका चोप्रा भारतात आली आहे. तसेच या साखरपुड्या प्रियंकाची चुलत बहिण आणि बिग बॉस फेम मन्नारा चोप्रा देखील सहभागी झाले आहेत. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. 

1/7

सिद्धार्थ-नीलमचा साखरपुडा

प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राने सोमवारी गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री नीलम उपाध्यायसोबत साखरपुडा केला आहे. हा खास दिवस दोघांनी आपल्या कुटुंबासोबत साजरा केला आहे. कपलने इंस्टाग्रामवर आपले फोटो शेअर केले आहे. लवकरच हे दोघे विवाहबंधनात अडकले आहेत. 

2/7

प्रेमळ कॅप्शन

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सिद्धार्थ चोप्रा आणि नीलम उपाध्याय एकमेकांसोबत अतिशय आनंदी आणि रोमँटिक दिसत आहेत. नीलमने यावेळी गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केलाय तर सिद्धार्थ व्हाइट रंगाची शेरवानी घातली आहे. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्या नात्यातील गोडवा दाखवत आहे. 

3/7

तिसऱ्यांदा साखरपुडा

सिद्धार्थ आणि नीलम या दोघांना 2020 मध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या होली पार्टीमध्ये पाहिलं. यानंतर दोघांची खूप चर्चा झाली. या अगोदर सिद्धार्थचा दोन वेळा साखरपुडा झाला होता. मात्र हे नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अनेक वर्ष डेटिंग केल्यानंतर सिद्धार्थने नीलमशी साखरपुडा केला आहे. या अगोदर सिद्धार्थचा साखरपुडा इशिता कुमार आणि कनिका माथुरसोबत झाला होता. 

4/7

भावाच्या साखपुड्यासाठी भारतात आली प्रियंका

निर्माता सिद्धार्थ चोप्रा हा प्रियंकाचा भाऊ आहे. भावाच्या साखरपुड्याकरता प्रियंका भारतात आली आहे. तिने देखील इंस्टाग्रामवर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. ज्यामुळे तिने आपल्या वडिलांची आठवण काढली आहे. यावेळी प्रियंका भगव्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. 

5/7

कुटुंबासोबतचे खास फोटो

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये सिद्धार्थ आणि नीलम पेपर साइन करताना दिसत आहे. या दोघांनी आपला आनंद कुटुंबासोबत शेअर केला आहे. या दरम्यान सिद्धार्थ आणि नीलमच्या कुटुंबाचा देखील फोटो शेअर केला आहे. 

6/7

कधी करणार लग्न

या दोघांच्या साखरपुडानंतर आता लग्न कधी असा प्रश्न विचारला जात आहे. मात्र चाहत्यांना यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. याचवर्षी सिद्धार्थ आणि नीलम यांची एप्रिल महिन्यात रोको सेरिमनी झाली होती. यावेळी प्रियंका चोप्राचा नवरा जोनस आणि मुलगी मेरी मालती देखील उपस्थित होती. 

7/7

खास फोटो पोस्ट

प्रियंकाने यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. कुटुंबासोबतचा जुना फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये प्रियंका चोप्रा आपल्या आई-वडिल आणि भावासोबत दिसत आहे. एखादा आनंदाचा क्षण म्हटलं की, आपल्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीची आठवण येतेच. तर त्या भावूक आठवडीमध्ये प्रियंका चोप्राने हा फोटो पोस्ट केला आहे.