हुबेहूब बिग बींसारखा दिसणारा व्यक्ती, लवकरच झळकणार चित्रपटात

३० वर्षांचे शशिकांत बिग बींची नक्कल देखील करतात.  

Jan 27, 2020, 23:19 PM IST

मंबई : शशिकांत पडेवाल हे सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, लोनावळा-पुणे येथे प्राध्यापक आहेत. शशिकांत एका कारणासाठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. त्यांचा चेहरा हुबेहूब बॉलिवूडचे अभिनेते आमिताभ बच्चन यांच्यासोबत मिळता-जुळता आहे. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत. शशिकांत बिग बींची हेयर स्टायल, त्यांचं बोलणं-चालणं, एकंदर त्यांच्या सर्वच गोष्टींचे अनुकरण करतात. ३० वर्षांचे शशिकांत बिग बींची नक्कल देखील करतात.

1/5

जेव्हा ते दहावीला होते तेव्हा त्यांच्या मित्रांनी त्यांना सांगितले की तू हुबेहूब अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या सारखा दिसतो .  

2/5

त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ते लवकरच हिंदी चित्रपटात देखील अभिनय करण्याच्या मार्गावर आहेत.   

3/5

शिवाय त्यांचे टीक-टॉक व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. १९९१ सालपासून ते बिग बींचं अनुकरण करतात.   

4/5

त्याचप्रमाणे ते सामाजिक कार्यात देखील नेहमी भाग घेत असतात.   

5/5

वृद्धांसाठी ते वृद्धाश्रम उभारणार आहेत. त्याचप्रमाणे तरूणांसाठी देखील काम करण्याचं त्यांचा मानस आहे.