ऑक्सिजन पुरवणारी 'ही' झाडं घराजवळ असायलाच हवी

अन्न, वस्त्र आणि निवारा यापलिकडे माणसांना ऑक्सिजनची देखील गरज असते. जर तुम्ही तुमच्या घराजवळ किंवा बिल्डिंगच्या परिसरात वृक्षरोपण करणार असाल तर या झाडं तुम्ही तुमच्या आजुबाजूला लावू  शकता.    

Jul 18, 2024, 14:59 PM IST

झाडं सावली, फळं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑक्सिजन देतात. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात की, 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे'.याचा अर्थ असा की, झाडं आपल्या आयुष्याचा एक भाग आहेत. 

1/6

तुळस

अंगणात किंवा बाल्कनीत तुळस असेल तर घरातलं वातावरण शुद्ध राहतं. तुळशीमुळे हवा खेळती राहते. जर तुमच्या बाल्कनीत तुळस असेल तर सहसा तुम्हाला श्वसनाचे आजार होणार नाही, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं. 

2/6

कडूनिंबाचं झाड

जर तुम्ही डासांना वैतागले असाल तर, दारात कडूनिंबाचं झाड नक्की लावा. कडूनिंबाचं झाड आजूबाजुची हवा शुद्ध करतं. शिवाय सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतं. कडूनिंबात औषधी घटक जास्त असतात. त्यामुळे जर तुमच्या घराच्या अवतीभवती कडूनिंबाचं झाड असेल तर घरात डास देखील येत नाही. 

3/6

वडाचं झाड

वड शंभर ते दिडशे वर्ष चांगलं जगतं. वडाची मूळं माती घट्ट धरुन ठेवतात.त्यामुळे वडाच्या झाडाखाली पाण्याचे साठे जास्त असतात. वडाचं झाड हवेतील प्रदुषण कमी करतं आणि ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देतं. जर तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला श्वासनाचा आजार असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या जवळ वडाचं झाड लावू शकता. 

4/6

सागाचं झाड

तुमच्या बिल्डिंग परिसरात झाडं लावायची असतील तर तुम्ही सागाचं झाड लावू शकता. गावच्या तुलनेत शहरात सागाची झाडं पहायला देखील मिळत नाही. सागाच्या खोडं खूप भक्कम असतं. त्यामुळे फर्निचर तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. सागाच्या लाकडाला किड लागत नाही. या झाडामुळे हवेतील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. 

5/6

निलगिरीचं झाड

निलगिरीच्या पानांना सुगंध असतो. या झाडामुळे हवेतील जीवजंतू मरतात. निलगीरीच्या झाडामुळे हवा शुद्ध होते. या औषधी घटकांमुळे प्रदुषण नियंत्रणात येतं. जर तुमच्या दारापुढे निलगिरी झाड लावलं तर किटकांचं प्रमाण देखील कमी होतं.    

6/6

चंदनाचं झाड

चंदन सुवासिक असण्याबरोबरच औषधी देखील आहे. चंदनाचं झाड दुर्मिळ असलं तरी या झाडामुळे हवेतील प्रदुषण कमी होतं. चंदनाच्या झाडातील औषधी घटकांमुळे ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत होते.