डाळींचे दर कडाडले! ऐन सणासुदीच्या दिवसात सामन्यांच्या खिशाला दरवाढीची झळ...

पावसाच्या अनिश्चिततेमुळे हे दर अजून वाढण्याची शक्यताही आता वर्तवली जात आहे. चला तर मग आढावा घेऊया डाळींच्या आधी आणि आताच्या दरांचा. 

Aug 31, 2023, 13:19 PM IST

pulses price hike : सणासुदीचे दिवस येऊ घातले असतानाच जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामन्यांची चिंता वाढली आहे. त्यातच आता डाळींचे दर आभाळाला जाऊन भिडलेत. त्यामुळं सामन्यांच्या मनात त्यांच्या ताटातील डाळ गायब होते की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. 

 

1/7

ऐन सणासुदित सामन्यांच्या खिशाला कात्री

pulses price rise among inflation

श्रावणात ऐन सणासुदीच्या दिवसांत डाळींचे दर वाढलेत. मसूरडाळीपासून तूरडाळीपर्यंत सर्वच डाळी महागल्या आहेत. 

2/7

धान्यांच्या भाववढीने सामान्य जनता त्रस्त

pulses price rise among inflation

धान्यांच्या भाववढीने सामान्य जनता पुरती त्रस्त झाली आहे. आणि त्यातच भर घालत आता डाळींचे दर चक्क दीडशे रुपयांपर्यंत जाऊन पोहचलेत. आणि हे दर किमान काही आठवड्यापासूनतरी तसेच आहेत.   

3/7

मसूर

pulses price rise among inflation

  सर्वसामान्यांच्या घरात हमखास वापरल्या जाणाऱ्या मसूर डाळीचा आताचा दर 72 रुपये प्रतिकिलो आहे. याआधी मसूर डाळ 52 रुपये प्रतिकिलो होती.   

4/7

मूग

pulses price rise among inflation

मूगडाळीचा याआधी दर 80 रुपये प्रतिकिलो होता , तो दरवाढीनंतर 110 रुपये प्रतिकिलो इतका झाला  आहे. वर्षभरात मूगडाळ दुप्पटीपेक्षाही जास्त महाग झाल्याचे दिसून येते.  

5/7

तूर

pulses price rise among inflation

तूरडाळीचे दर सध्या तेजीत दिसून येत आहेत. याआधी जी तूरडाळ 100 रुपये प्रतिकिलो होती ती आता 150 रुपयांच्या घरात जाऊन पोहचली आहे. इतकंच नाही तर या वर्षभरात तूरडाळ 27 टक्क्यांनी महागली आहे.   

6/7

उडीद

pulses price rise among inflation

याआधी उडीद डाळ 90 रुपये प्रतिकिलो इतकी होती. तर आता उडीदडाळीचा दर 110 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे.   

7/7

हरभरा

pulses price rise among inflation

हरभरा डाळीचा याआधी 57 रुपये प्रतिकिलो असा दर होता. दरवाढीनंतर आता चनाडाळ 70 रुपये प्रतिकिलो इतकी झाली आहे.