226693 कोटी संपत्ती, 100 कोटींच्या कार.. पुणेकर जोडप्याने मुंबईत घेतला 500 कोटींचा बंगला; पाहा Photos

Pune Industrialist Couple Buy 500 Crore Mansion In Mumbai: हे अब्जाधीश पुणेकर जोडपं आता मुंबईकर होणार असून त्यांच्याकडे असलेल्या गाड्यांचं कलेक्शनच 100 कोटींहून अधिक किंमतीचं आहे. त्यांचा हा नवा आलिशान बंगला कसा असणार आहे? त्यामध्ये नेमकं काय काय आहे जाणून घेऊयात...

| Aug 11, 2024, 15:11 PM IST
1/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

त्यांच्याकडील कार कलेक्शनची किंमतच 100 कोटींहून अधिक आहे. हे पुणेकर जोडपं आहे तरी कोण ते जाणून घेऊयात आणि त्यांचं नवं घर कसं आहे पाहूयात...

2/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

पुण्यातील अब्जाधीश उद्योजक योहान पुनावाला आणि त्यांची पत्नी मिश्चेल हे आता मुंबईकर होणार आहेत. त्यांनी दक्षिण मुंबईमधील सर्वात महागडा आणि नामवंत व्यक्तींचं वास्तव्य असलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कफ परेड येथे 30 हजार स्वेअर फुटांचा आलिशान बंगला विकत घेतला आहे.

3/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

पुनावाला दांपत्याने हा बंगला तब्बल 500 कोटी रुपयांना विकत घेतल्याचं वृत्त 'इकनॉमिक टाइम्स'ने दिलं आहे. मागील काही काळात मुंबईत जमीनी तसेच घरांसंदर्भात झालेल्या सर्वात महागड्या व्यवहारांमध्ये या 500 कोटींच्या व्यवहाराचा समावेश होतो.  

4/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

पुनावाला दांपत्याचं मुंबईतील हे आलिशान घर हे दुसरं घर असणार आहे. या घराला ते 'पुनावाला मॅन्शन' असं नाव देणार असल्याचं समजतं.

5/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

योहान पुनावाला हे पुनावाला इंजिनिअरिंग ग्रुपचे अध्यक्ष आणि पुनावाला स्टड फार्म्सचे निर्देशक आहेत. पुनावाला कुटुंबाचा घोड्यांच्या शर्यतीचा आणि खरेदी विक्रीचा पूर्वापार व्यवसाय असून तोच योहान पुनावाला संभाळतात.   

6/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

योहान पुनावाला यांची अगदी थोडक्यात ओळख सांगायची झाली तर उद्योजक असण्याबरोबरच ते जगप्रसिद्ध घोड्याचे व्यापारी आहेत असं म्हणता येईल.

7/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

योहान पुनावाला यांचे वडील झवेरी पुनावाला हे भारतामधील आघाडीची लसनिर्मिती कंपनी असलेल्या सिरम इन्स्टीट्यूचे सहसंस्थापक आहेत. याच सिरममधून कोरोनाच्या कालावधीमध्ये कोट्यवधी कोरोना लसींची निर्मिती करुन त्या जगभरात निर्यात करण्यात आल्या होत्या. 

8/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

योहान पुनावाला यांची ओळख जगातील सर्वोत्तम घोड्यांची पैदास केल्या जाणाऱ्या तबेल्याचे म्हणजेच स्टड फार्मचे मालक अशीही आहे. 

9/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

तर मश्चेल पुनावाला या पुनावाला इंजिनिअरिंग कंपनीजच्या व्यवस्थापकीय निर्देशक आहेत. त्या एमव्हापी डिझाइन स्टुडिओच्या मालकीणही आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच आता मुंबईतील या नव्या 'पुनावाला मॅन्शन'चं रिनोव्हेशन होणार असल्याचं वृत्त आहे. 

10/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

मुंबईमधील या 'पुनावाला मॅन्शन'समोर मोठी रिकामी जागा आहे. बंगल्याला मोठ्या आकाराची गच्ची आहे. या बंगल्याला अनेक मजले आहेत.

11/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

बंगल्याचं बांधकाम अशाप्रकारचं आहे की खासगीपणा जपला जाईल. या बंगल्यामध्ये भरपूर जागा असून या ठिकाणी पुनावाला दांपत्याला त्यांच्याकडील महागड्या आणि आगळ्या-वेगळ्या दुर्मिळ कलाकृती ठेवता येतील.

12/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

या 'पुनावाला मॅन्शन'मधील काही भाग हा पुनावाला दांपत्याकडे असलेल्या कलाकृतींनी सजवून खासगी आर्ट गॅलरी तयार केली जाणार आहे. 

13/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

'पुनावाला मॅन्शन'मधील या खासगी आर्ट गॅलरीमध्ये मिश्चेल पुनावाला यांना काढलेल्या ऑइल पेंटींग आणि पुरस्कार विजेत्या चित्रांचा समावेश असेल. 

14/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

पुनावाला यांच्या या मुंबईतील आलीशान प्रॅपर्टीमधील एका भाग केवळ त्यांच्याकडील जुन्या, व्हिंटेज आणि आधुनिक कार्सच्या कलेक्शनसाठी राखीव ठेवला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

15/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

योहान पुनावाला यांना कार्सचं प्रचंड वेड असून त्यांच्याकडे जगात कोणाकडेही नसतील अशा कस्टमाइज कार आहेत. त्यांच्याकडील कार्सची एकूण किंमत 100 कोटींहून अधिक आहे.  

16/16

Yohan Poonawalla 500 Crore Mumbai Home

पुनावाला कुटुंबाची एकूण संपत्ती 2 लाख 26 हजार 693 कोटी रुपये असल्याचं 'डीएनए'ने सार्वजनिकरित्या उपलब्ध माहितीच्या आधारे दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.