PV Sindhu लवकरच अडकणार लग्नबंधनात; काय करतो होणारा पती? लग्नाबद्दल A to Z माहिती
नागा चैतन्य, शोबिता धुलिपाला यांच्यापाठोपाठ आता बॅडमिंटनपट्टू पीव्ही सिंधू लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या लग्नाबद्दल संपूर्ण माहिती.
भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू विवाहबंधनात अडकणार आहे. ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल खेळापर्यंत देशाला गौरव मिळवून देणाऱ्या या खेळाडूने तिच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ती कुणाला डेटही करत नव्हती. महिनाभरात त्यांचे लग्नही निश्चित झाले. बॅडमिंटन कोर्टवर जगातील अनेक दिग्गजांना पराभूत करणारी ही सुपरस्टार आता नववधू होणार आहे.