राधिकाच्या गाली अनंतच्या नावाची हळद; शाही सोहळ्यात कोणी केली धमाल, कोणी केला कल्ला? पाहा Viral Photo

राधिका आणि अनंतच्या हळदी समारंभ नुकताच पार पडला. यावेळी पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली राधिका खुपच सुंदर दिसत होती. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमातील फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे.   

Jul 10, 2024, 10:38 AM IST

अनंत अंबानी  आणि राधिका मर्चंट यांचा संगीतसोहळा काही दिवसांपूर्वीच पार पडला. 

 

1/8

या संगीत सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकांरांनी उपस्थिती दर्शवली होती. त्याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

2/8

अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा जिओ वर्ल्ड सेंटर येथे  पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड स्टार्स पासून ते क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. 

3/8

संगीत मागोमागच राधिका आणि अनंतच्या हळदीसमारंभही नुकताच पार पडला. पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली राधिका खुपच सुंदर दिसत होती.   

4/8

हळदीच्या कार्यक्रमात फुलांच्या दागिन्यांनी राधिका नववधूच्या वेशात सजली होती. साधा मेकअप, न्यूड शेडची लिपस्टिक,  असा राधिकाचा लुक खुपच खास दिसत होता.  

5/8

त्याशिवाय देखील कार्यक्रमातील राधिकाचा लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

6/8

पांढऱ्या रंगांची किनार अलणारा लाल लेहंगा आणि पांढऱ्या रंगांचा हिऱ्यांचा हार राधिकावर खुपच खुलून दिसत होता. 

7/8

हळदी समारंभात अनेत दिग्गज मंडळी आणि सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. अंबानी कुटुंबाचे हळदीतील फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. 

8/8

बॉलिवूड कलाकार अनन्या पांडे आणि जान्हवी कपूरची बहिण खुशी कपूर यांचे या हळदीच्या कार्यक्रमातील पारंपारिक लुकमधले फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दर्शविली.