मुलाला हरिपाठ पाठ नाही पण गौतमीची गाणी... तमाशाकलावंत रघुवीर खेडकर यांनी व्यक्त केला संताप

Gautami Patil : लावणी डान्सर गौतमी पाटीला मिळणाऱ्या मानधनावारुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गौतमीला मिळणाऱ्या मानधनावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर आता जेष्ठ तमाशाकलावंत रघुवीर खेडकर यांनीही याबाबत भाष्य केले आहे.

Apr 08, 2023, 18:57 PM IST
1/6

lavni dancer gautami patil

आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात, अशी टीका इंदुरीकर यांनी केली होती.

2/6

raghuvir khedkar angry on gautami patil

त्यानंतर बोलताना जेष्ठ तमाशाकलावंत रघुवीर खेडकर (Raghuvir Khedkar) यांनीही गौतमी पाटीलला मिळणाऱ्या मानधनावरुन जोरदार टीका केली आहे.

3/6

gautami patil

बऱ्याच गावातील लोक 100 कलावंत असणाऱ्या तमाशाला दोन लाख रुपये देण्यासाठी खुटतात. अक्षरक्षः हात जोडतात. गौतमी पाटीलला पाच लाख रुपये देतात, असेही रघुवीर खेडकर म्हणाले

4/6

raghuvir khedkar

कलेची गौतमी पाटील करु नका. लोककला लोककलाच राहिली पाहिजे. मुले कोणत्या वळणाला चालली आहेत. आई वडिलांचे लक्ष कुठे आहे? मुलगा रात्री कोणाच्या कार्यक्रमाला जातोय हे विचारत का नाही? असा सवालही त्यांनी केलाय

5/6

raghuvir khedkar vs gautami patil

तुमच्या मुलाला हरिपाठ पाठ नाही आणि गौतमी पाटीलची सगळी गाणी पाठ आहेत. काय चाललंय हे? तमाशाला आजपर्यंत नावं ठेवली जात होती. तमाशामधल्या कुठल्या मुलीने असे हातवारे केले होते? 

6/6

raghuvir khedkar on gautami lavni

गौतमी पाटीलने केलेले हातवारे पाहण्यासाठी तुम्ही मारामाऱ्या करता. महाराष्ट्र कोणत्या दिशेने चालला आहे? याकडे पालकांनी, राजकारण्यांनी लक्ष ठेवले पाहिजे. नाहीतर महाराष्ट्राचा बिहार होईल