मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज; राज ठाकरे संतापले

जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध केला. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Sep 03, 2023, 00:00 AM IST

Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: मराठा आंदोलकांवर लाठीचार्जनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे संतापले आहेत. जालन्यात सरकारचं चुकलंच असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. हा प्रश्न चिघळण्यात आधीचे आणि आत्ताचे सगळेच जबाबदार आहेत अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

 

1/7

राज ठाकरे यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

2/7

या घटनेला सरकार जबाबदार आहे. 

3/7

मराठा समाजाला आरक्षण देणे खरचं शक्य आहे का? याबबात सरकारने पावले उचलली पाहिजेत. 

4/7

जालन्यात नेमकं काय झाल ते तपासात समोर येईल. 

5/7

मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलनं केली, त्या आंदोलनांचा इतिहास बघितला असता सर्व आंदोलने शांततेने झाली आहेत. 

6/7

लाठीचार्ज झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी ह्याचा निषेध नोंदवतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

7/7

 मराठा मोर्चातील आंदोलकांवर लाठीमार करणं यात प्रशासन आणि सरकार चुकलं आहे.