RAW एजंटला किती पगार मिळतो? निवड, कामाचे स्वरुप जाणून घ्या

रॉ एजंट आणि अधिकाऱ्यांना आर्थिक वर्षात दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार मिळतो. परदेशात पोस्ट केलेले RAW कर्मचारी विशेष महागाई वेतन तसेच परदेशी सेवा भत्ता मिळण्यास पात्र असतात. त्यांना एक अद्वितीय सुरक्षा भत्ता देखील मिळतो, जो त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असू शकतो, तसेच मूळ वेतन आणि महागाई भत्ता देखील मिळतो.

| Jul 28, 2023, 15:38 PM IST

RAW Agent: रॉ एजंट आणि अधिकाऱ्यांना आर्थिक वर्षात दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार मिळतो. परदेशात पोस्ट केलेले RAW कर्मचारी विशेष महागाई वेतन तसेच परदेशी सेवा भत्ता मिळण्यास पात्र असतात. त्यांना एक अद्वितीय सुरक्षा भत्ता देखील मिळतो, जो त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असू शकतो, तसेच मूळ वेतन आणि महागाई भत्ता देखील मिळतो.

1/9

RAW एजंटला किती पगार मिळतो? निवड, कामाचे स्वरुप जाणून घ्या

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

RAW Agent: तुम्ही राझी, मिशन मंजू, अझान, एजंट विनोद हे सिनेमा पाहिले असतील तर रॉ एजंटचे काम सर्वसाधारणपणे कसे असते हे लक्षात आले असेल. अनेक तरुणांना आयुष्यात असं काही तरी करुन दाखवायच असतं ज्यामुळे त्यांचे देशभरात कौतुक होईल. रॉ एजंट बनून देशसेवा करण्याची संधी तुम्हाला मिळते. सिनेमात दाखवलेला रॉ एजंट आणि प्रत्यक्षातील काम यात खूपच फरक असतो. या रॉ एजंटची निवड कशी होते? त्यांना किती पगार असतो? असे प्रश्न तुम्हालाही कधीतरी पडले असतील. आपण या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

2/9

राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

जगभरातील शत्रूंपासून राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करणे हे रॉ एजंटचे मुख्य काम आहे. ही नोकरी देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे खूप लोक यासाठी अर्ज करतात. सर्वात मुख्य म्हणजे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मजबूत असलेल्यांनाच येथे नोकरी मिळू शकते.

3/9

RAW एजंटसाठी पात्रता

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.अर्जदारांनी त्यांचे मित्र आणि नातेवाईकांना नोकरीबद्दल सांगता कामा नये अर्जदारांवर कोणताही गुन्हा नसावा. अर्जदारांना ड्रग्जचे व्यसन नसावे.उमेदवारांनी अल्प सूचनेवर देशातील कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्याची तयारी ठेवावी.

4/9

किमान 20 वर्षांचा अनुभव

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

अर्जदाराने तो कोण आहे याबद्दल प्रामाणिक असणे आवश्यक आहे.उमेदवारांनी नामांकित विद्यापीठातून भरीव शिक्षण घेतलेले किमान एका परदेशी भाषेत प्रवीण असणे आवश्यक आहे. RAW मध्ये सामील होण्यास इच्छुक असलेल्या अधिकाऱ्यांना किमान 20 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.  

5/9

RAW मध्ये निवड आणि पगार

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

RAW मध्ये नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. निवड प्रक्रियेमध्ये मुलाखत आणि त्यानंतर लेखी चाचणी असते.  रॉ एजंटसाठी UPSC किंवा SSC द्वारे निवडलेल्या उमेदवारांमधून उमेदवारांची निवड केली जाते. 

6/9

सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

केंद्रीय कर्मचारी योजनेंतर्गत, उमेदवारांना 'गट अ' नागरी सेवा परीक्षेला बसावे लागेल. त्यांना ही नागरी सेवा परीक्षेत सर्वच विभागांमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. या परीक्षांमध्ये पात्र ठरलेल्या व्यक्तींनाच रॉ परीक्षा देण्याची परवानगी आहे.

7/9

पगार आणि भत्ते

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

RAW एजंटला विविध फायदे आणि भत्त्यांसह चांगला पगार दिला जातो. असे असले तरीही रॉ एजंटला नेमका किती पगार मिळतो, याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. तरी हा पगार 80 हजार ते 1 लाख 30 हजार रुपयापर्यंत असू शकतो असे म्हटले जाते.  

8/9

विशेष महागाई वेतन

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

RAW एजंट आणि अधिकाऱ्यांना आर्थिक वर्षात दोन महिन्यांचा अतिरिक्त पगार मिळतो. परदेशात पोस्ट केलेले RAW कर्मचारी विशेष महागाई वेतन तसेच परदेशी सेवा भत्ता मिळण्यास पात्र असतात. त्यांना एक अद्वितीय सुरक्षा भत्ता देखील मिळतो, जो त्यांच्या एकूण उत्पन्नापेक्षा जास्त असू शकतो, तसेच मूळ वेतन आणि महागाई भत्ता देखील मिळतो.  

9/9

रॉ एजंट प्रशिक्षण

RAW Agent Selection Process How much salary is received know Details

RAW प्रशिक्षण अनेकदा अनेक वर्षे चालू शकते. भरती झालेल्या व्यक्तीला परदेशी भाषेत प्राविण्य कसे मिळवायचे आणि भौगोलिक-सामरिक विश्लेषण कसे करावे हे शिकवले जाते. त्याला रात्रीच्या अभ्यासात घुसखोरी करण्यास शिकवले जाते. अंदाज घेणे, कलासक्त असणे, संवादातून ओळख वाढणणे आणि इतर अनेक बुद्धिमत्तेशी संबंधित क्षमता शिकविल्या जातात. फील्ड इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मूलभूत प्रशिक्षण आणि नंतर अॅडव्हान्स प्रशिक्षण अशा दोन टप्प्यांत प्रशिक्षण विभागले गेले आहे.