चहा बनवल्यानंतर किती वेळात प्यावा? तो वारंवार गरम करण्याची चूक करू नका

Reheating Tea Side Effects: चहा पिणाऱ्यांच्या या यादीच तुमचंही नाव येतं का? दिवसातून किमान दोनदा तरी चहा पिणं होतंय का? ही माहिती वाचा... भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठी आहे. पाऊस असो, हिवाळा असो किंवा मग अगदी रणरणतं ऊन असो. काही मंडळींच्या हाती चहाचा प्याला दिला नाही, तर त्यांची सारी गणितच बिनसतात.   

May 22, 2024, 18:24 PM IST

Reheating Tea Side Effects: भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठी आहे. पाऊस असो, हिवाळा असो किंवा मग अगदी रणरणतं ऊन असो. काही मंडळींच्या हाती चहाचा प्याला दिला नाही, तर त्यांची सारी गणितच बिनसतात. 

1/7

चहा

reheating the tea can  be so harmfull know the reason

Is Reheating Tea Dangerous For Body: चहाशिवाय आमचं पानच हलत नाही... चहाशिवाय दिवस सुरु झाला असं वाटतच नाही... ही अशी चहावरील प्रेम व्यक्त करणारी वाक्य अनेकदा ऐकायला मिळतात. 

2/7

चहा प्रेम

reheating the tea can  be so harmfull know the reason

भारतीयांचं चहावर असणारं प्रेम लपून राहिलेलं नाही. पण, चहाचं अती प्रमाणातील सेवन मात्र शरीरास हानिकारक ठरू शकतं. याहूनही चहाबाबतची आणखी एक सवयही शरीराचं नुकसान करु शकते.   

3/7

तुम्हालाही आहे ता ही सवय?

reheating the tea can  be so harmfull know the reason

अनेकांच्या घरी चहा एकदा बनवल्यानंतर तो, उरला तर पुन्हा गरम करून प्यायला जातो. असं करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक असाल, तर आताच सावध व्हा. कारण, ही सवय धोक्याची सूचना आहे. 

4/7

चहा वारंवार गरम करताय?

reheating the tea can  be so harmfull know the reason

चहा वारंवार गरम केल्यास त्याची चव पूर्णपणे बिघडून जाते. तर, बऱ्याच वेळापासून बनवून ठेवलेल्या चहामध्ये टॅनिनचं प्रमाण वाढतं. ज्यामुळं चहा कडू होत जातो. 

5/7

नकारात्मक परिणाम

reheating the tea can  be so harmfull know the reason

चहा तयार केल्यानंतर तुम्ही तो तीन ते चार तासांनंतर पित असाल तर, त्याचे शरीरावर नकारात्मक परिणाम दिसून येतात. अशा चहामध्ये अनेकदा बॅक्टेरिया वाढतात. 

6/7

पोषक तत्त्वं

reheating the tea can  be so harmfull know the reason

चहा वारंवार गरम केल्यास त्यातील पोषक तत्त्वं नष्ट होण्यासोबतच अपचन, पोट फुगणं, मळमळणं, पोटदुखी या आणि अशा काही समस्या सतावू लागतात. 

7/7

बॅक्टेरियाचा धोका

reheating the tea can  be so harmfull know the reason

दुधाचा चहा असल्याच त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक असतो. ज्यामुळं अनेकदा आतड्याचे विकार आणि पोटाचं आरोग्य बिघडतं. त्यामुळं चहा बनवल्यानंतर तो 10 ते 15 मिनिटांच्या आत पिऊन संपवणं अपेक्षित असतं. (वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)