नीता अंबानी आणि टीना दोन्ही जावांचं नातं कसं आहे?

मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी आणी अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानी या दोन्ही जावांचं नातं कसं आहे असे प्रश्न अनेकदा प्रेक्षक विचारत असतात.

Aug 06, 2024, 16:08 PM IST
1/8

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात मोठे उद्योगपती आहेत. अंबानी कुटुंबाचा व्यवसाय परदेशात पसरलेला आहे. धीरूभाई अंबानी यांना मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी अशी दोन मुले आहेत. मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी  करिअरमध्ये अनेक चढउतारही पाहिले आहेत.

2/8

मुकेश अंबानी यांनी नीता अंबानी तर अनिल अंबानी यांनी अभिनेत्री टीना मुनीमशी सोबत लग्न केले.दोन्ही भावांच्या लग्नाला बरेच वर्ष झाली असली तर नीता अंबानी आणि टीना अंबानी यांच नातं कसं हे जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.   

3/8

नीता अंबानी आणि टीना अंबानी यांचे वैयक्तिक आयुष्य हे फारसं कधी समोर  आले नाही. दोघींनाही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर चर्चा केलेली आवडत नाही. 

4/8

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण मोठा जाऊबाई या टीना अंबानींपेक्षा 7 वर्षांनी लहान आहेत.  टीना अंबानी यांचं वय 67 तर  नीता अंबानी यांचं वर 60 आहे. पार्टी असो किंवा कोणताही कार्यक्रम दोघीही परफेक्ट स्टाईलमध्ये असतात.  

5/8

टीना अंबानी या लग्नापूर्वी अभिनेत्री होत्या हे आपल्या सर्वांनाच माहित आहे तर नीता अंबानी या लग्नापूर्वी शिक्षिका होत्या.तर या दोघींमधलं नातं मैत्रिपूर्ण आहे.

6/8

अनिल अंबानींसोबत लग्न केल्यानंतर टीना अंबानींनी बॉलिवूड सोडलं.त्यानंतर त्यांनी पतीला व्यवसायात मदत केली.आज त्या कोकिलाबेन धीरूभाई हॉस्पिटलचा व्यवसाय पाहतात.त्याचबरोबर त्या अनेक फाऊंडेशन सोबतही जोडल्या गेल्या आहेत.

7/8

तर नीता या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापक आणि चेअरपर्सन आहे. नीता  अंबानींची आशियातील प्रभावशाली व्यावसायिक नेता म्हणून निवड करण्यात आली होती. इतकेच नाही तर नीता अंबानी या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या भारतीय सदस्य महिलादेखील आहेत. 

8/8

नीता अंबानी आणि टीना अंबानी यांच्यात चांगले संबंध आहेत. अनेकवेळा टीना अंबानी मुकेश अंबानी आणि नीता अंबानींसोबत फोटो शेअर करत असतात.यावरून असे समजते की दोन्ही कुटुंबामध्ये खूप चांगले नाते आहे. लग्न असो वा कोणताही कार्यक्रम एकमेकांना ते नेहमीच मदत करतात.