Relationship Tips:सोशल मीडियात जितके जास्त फोटो तितके नाते कमकुवत! रिसर्च आला समोर

Relationship Tips:सोशल मीडियावरील लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्समुळे जोडीदारांत मत्सर वाढवतो. तुम्ही जोडीदाराच्या प्रत्येक सोशल मीडियातील अॅक्टीव्हीटीवर नजर ठेवून राहिलात तर अनेक वेळा  जोडीदार गोंधळून जातो. 

| Dec 29, 2023, 11:08 AM IST

Relationship Tips:सोशल मीडियावर तुमच्या कोणत्या मित्रांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हेही लोकांना सांगते. जर तुम्ही त्याच्या/तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नसाल तर नात्यात दुरावा वाढतो.

1/12

Relationship Tips:सोशल मीडियात जितके जास्त फोटो तितके नाते कमकुवत! रिसर्च आला समोर

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

Relationship Tips: तुमचा एखादा मित्र विकेंडला बायकोसोबत फिरायला जातो. दररोज संध्याकाळी नवनवे पदार्थ खातो. त्या सर्व अपडेट सोशल मिडियात टाकतो. त्यांना पाहून हे किती आनंदी आयुष्य जगतायत, असं तुम्हाला वाटत असेल ना? पण प्रत्यक्षात असं नाहीय.

2/12

संशोधनातून बाब समोर

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

सोशल मीडियावर जास्त फोटो अपलोड करणार्‍या जोडप्यांचे खरे नाते कमकुवत असते. त्यांचे जीवन कमी आनंदी असते. हे दुसरे कोणी सांगत नाहीय. तर एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. दुसरीकडे, सोशल मीडियावर क्वचित किंवा अधूनमधून फोटो पोस्ट करणारे जोडपे अधिक आनंदी असतात आणि त्यांचे नाते अधिक चांगले राखतात, असेही या संशोधनात म्हटले आहे.

3/12

सोशल मीडियाचा वापर आणि नातेसंबंध

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

अमेरिकेच्या कन्सास विद्यापीठात 300 विवाहित आणि प्रेमळ जोडप्यांवर संशोधन करण्यात आले. त्यानंतर समोर आलेली माहिती कपल्सना मोठी शिकवण देणारी आहे. संशोधनात, सोशल मीडियाचा वापर आणि नातेसंबंध यांच्यात विपरित संबंध आढळून आला. यापैकी एकाचा अतिरेक दुसऱ्याचा प्रभाव कमी करू शकतो, असेही यात म्हटले.

4/12

कमी वापर तितके नाते मजबूत

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

संशोधनात घेण्यात आलेले जोडपे प्रत्येक जातीचे, देशाचे आणि लिंग-लैंगिकतेचे होते. संशोधकांनी कपल्यच्या 6 महिनातील सोशल मीडियाच्या अॅक्टीव्हिटीवर लक्ष ठेवले. याशिवाय या जोडप्यांचे वेळोवेळी काऊन्सेलिंग करण्यात आले, ज्यामध्ये त्यांच्याशी त्यांच्या नात्याबद्दल चर्चा करण्यात आली. निकालांमध्ये असे दिसून आले की, जोडप्यांनी सोशल मीडियाचा जितका कमी वापर केला तितके त्यांचे नाते अधिक मजबूत होते.

5/12

सोशल मीडिया संबंध कसे कमकुवत करते?

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

सोशल मीडिया नात्याची मुळे पोकळ करतो, असे संशोधकांनी सिद्ध केले आहे. पण असे का होते? सोशल मीडियावर फोटो अपलोड करणं ही केवळ टेक्निकल कसरत नसल्याचं  रिलेशनशिप कोच डॉ.अंजली सांगतात आणि सांगतात. यामुळे नातेसंबंधातील जोडप्याचे विचार आणि अपेक्षा दिसत असतात. 

6/12

दिखावा करण्याची प्रवृत्ती

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

ज्या जोडप्यांना त्यांच्या नात्यावर आणि जोडीदारावर फारसा विश्वास नाही, ज्यांना त्यांच्या नात्यातील 'चांगल्यापणा'वर इतरांची संमती हवी असते, अशा जोडप्यांमध्ये सोशल मीडियावर दिखावा करण्याची प्रवृत्ती जास्त दिसते, असे संशोधनातून समोर आले आहे. 

7/12

सोशल मीडियावर खोटं शो-ऑफ

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

दुसरीकडे, जो जोडीदार त्याच्या/तिच्या नात्यात आनंदी आणि समाधानी आहे त्याला नातं दाखवण्यासाठी किंवा सिद्ध करण्याचा कोणताही दबाव वाटत नाही. सोशल मीडियावर खोट्या शो-ऑफऐवजी ते त्यांच्या नात्याचा आनंद घेतात.

8/12

घटस्फोटाचे कारण सोशल मीडिया

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

अलीकडेच अमेरिकेत झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले आहे की, दर 7 घटस्फोटांपैकी एक घटना सोशल मीडियामुळे होते. तसेच, सोशल मीडियामुळे दर पाचपैकी एका जोडप्यामध्ये दररोज वाद होतात. बहुतेक लोक पार्टनरचे सोशल मीडिया अकाऊंट तपासतात, त्यांनी काय चॅट केलेय ते पाहतात. न कळवता एकमेकांचे फोन तपासणे आणि जोडीदाराच्या फोनमध्ये डोकावणे हे भांडणाचे सर्वात मोठे कारण ठरते.

9/12

नात्यात गोपनीयतेचा अभाव

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की जोडीदार एकमेकांच्या सोशल मीडिया अ‍ॅक्टिव्हिटींवर खूप लक्ष ठेवतात. ज्यामुळे कधी कधी नात्यात वाद निर्माण होतो. एकमेकांना ऑनलाइन असल्यामुळे जोडपे भांडतात. किंवा पोस्ट री-पोस्ट न केल्याने अडचणीत येतात, ज्यामुळे नात्यात शंका निर्माण होते.

10/12

नात्यात मत्सर वाढतो

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

सोशल मीडियावरील लाईक्स, कमेंट्स आणि फॉलोअर्समुळे जोडीदारांत मत्सर वाढवतो. तुम्ही जोडीदाराच्या प्रत्येक सोशल मीडियातील अॅक्टीव्हीटीवर नजर ठेवून राहिलात तर अनेक वेळा  जोडीदार गोंधळून जातो. 

11/12

नात्यात दुरावा

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

सोशल मीडियावर तुमच्या कोणत्या मित्रांनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या हेही लोकांना सांगते. जर तुम्ही त्याच्या/तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत नसाल तर नात्यात दुरावा वाढतो.

12/12

छोट्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करणे धोकादायक

Relationship Tips couples who constantly post photos on social media is weak Research

तुम्ही अशा अनेक लोकांना ओळखत असाल, जे सोशल मीडियावर काही झाले की लगेच मूड ऑफ, डू नॉट डिस्टर्ब, सो हॅप्पी आणि सो सॅड असे स्टेटस पोस्ट करतात. अनेक वेळा लोक त्यांच्या भावना दर्शविण्यासाठी 'इमोजी' वापरतात. अशा कृतींमुळे तुमच्या पार्टनरला त्रास होऊ शकतो. ज्यामुळे तुमचे नाते कमकुवत होऊ शकते, असे संशोधन सांगते.