...अन् धीरुभाई अंबानी यांनी 3 दिवस शेअर बाजार बंद पाडला, नेमकं असं काय झालं होतं?

Share Market मध्ये संपूर्ण तयारीनिशी उतरलेल्या धीरुभाई अंबानी यांनी फार कमी वेळात इथं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण, इथं त्यांचे शत्रू कमी नव्हते. या शत्रूंना दिवसा चांदणं दाखवण्याचं काम धीरुभाईंनी केलं आणि अनेकांनीच त्यांना सलमान ठोकला. 

Dec 28, 2023, 11:44 AM IST

Dhirubhai Ambani Birth Anniversary : अतिशय गरीब कुटुंबातून पुढं अप्रूप वाटेल इतका मोठा व्यवसाय उभा करणाऱ्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये हातभार लावणाऱ्या धीरुभाई अंबानी यांनी एकचा अशी चाल चालण्याचा निर्णय घेतला की त्यांचे शत्रूही चितपट झाले.

1/7

कंपनी लिस्ट करण्याचा निर्णय

Reliance Industries Founder Dhirubhai Ambani Success Story and records in share market

1977 मध्ये धीरुभाई यांनी (Reliance) रिलायन्स कंपनीला शेअर मार्केटमध्ये लिस्ट करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर रिलायन्सकडून 10 रुपये प्रती शेअर या दरानं 28 लाख इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले होते. इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) पासून या शेअर्सच्या विक्रीची सुरुवात झाली आणि पुढे वर्षभराच्या आतच रिलायन्सच्या शेअर्सची किंमत पाचपट वाढली.   

2/7

कर्जरोखानं पैसे

Reliance Industries Founder Dhirubhai Ambani Success Story and records in share market

1980 मध्ये शेअर्स 104 आणि 1982 मध्ये 18 टक्क्यांनी वाढून तब्बल 186 रुपयांवर पोहोचले. त्यानंतर डिबेंचर्सच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी अंबानींनी तयारी केली. अर्थात त्यांनी त्यांनी कर्जरोखानं पैसे गोळा करण्याचा मार्ग निवडला.    

3/7

धीरुभाईंचे शत्रू

Reliance Industries Founder Dhirubhai Ambani Success Story and records in share market

इथं धीरुभाई त्यांची खेळी खेळत असतानाच तिथं कोलकाता शेअर मार्केटमध्ये काही दलालांनी रिलायन्सचे शेअर्स पाडण्यासाठी कट रचला होता. ज्यानुसार एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेअर्स विकले जाऊ लागले. उतरती कळा लागलेल्या रिलायन्सच्या शेअर्सना कुणी खरेदी करणार नाही अशी अपेक्षा दलालांना होती. त्यातच कंपनी स्वत:चे शेअर खरेदी करु शकत नाही, असाही नियम त्यावेळी होता असल्यामुळं आणि धीरुभाई नवखे आहेत असा गैरसमज झाल्यामुळं दलाल बेसावध राहिले.  

4/7

रिलायन्सचे शेअर

Reliance Industries Founder Dhirubhai Ambani Success Story and records in share market

रिलायन्सचे शेअर पाडण्यासाठी दलालांकडून शॉर्ट सेलिंग सुरु करण्यात आली. ब्रोकरेजवर उधार स्वरुपात घेतलेल्या शेअर्सची (reliance share price) किंमत कमी झाल्यानंतर ते खरेदी करुन परतवायचे, मोठा नफा कमवायचा असा कट दलाल रचत होते. यानुसार जवळपास अर्ध्या तासात दलालांनी जवळपास साडेतीन लाथ शेअर्स शॉर्ट सेलिंगच्या माध्यमातून विकले. परिणामी रिलायन्सच्या शेअरची किंमत 131 वरून 121 रुपयांवर घरंगळली. 

5/7

दलालांच्या या कटाची कुणकूण

Reliance Industries Founder Dhirubhai Ambani Success Story and records in share market

धीरुभाईंना दलालांच्या या कटाची कुणकूण लागली आणि त्यांनी त्यांच्याच काही दलालांना रिलायन्स टेक्सटाइल इंडस्ट्रीजचे शेअर्स खरेदी करण्यास सांगितलं. आता बाजी पलटण्याचा क्षण होता.  एकिकडे (Kolkata share market) कोलकात्यातून दलाल (Bombay Stock Exchange) मुंबई शेअर बाजारात रिलायन्सचे शेअर विकत होते आणि दुसरीकडे अंबानींचेच दलाल शेअर्स विकत घेत होते. या शेअर्सची किंमत पडण्याऐवजी वाढत गेली आणि 125 रुपयांवर पोहोचली. 

6/7

शिकारीच जाळ्यात फसले

Reliance Industries Founder Dhirubhai Ambani Success Story and records in share market

खरेदीविक्रीच्या या सत्रात रिलायन्सचे 11 लाख शेअर विकले गेले. ज्यामध्ये 8 लाख 57 हजार शेअर अंबानींच्याच दलालांनी खरेदी केले होते. हे पाहून कोलकात्यात बसलेल्या दलालांच्या पायाखालची जमीन सरकली. पुढेच आलेल्या शुक्रवारी अंबानींच्या दलालांनी कोलकाता येथे असणाऱ्या दलालांकडून शेअर मागितले. त्यावेळी 131 रुपयांना तोंडी शेअर विकणाऱ्यांची अवस्थाच वाईट होती कारण, तोपर्यंत शेअर्सच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. बरं जास्तीची वेळ मागावी तर दलालांना जास्तीचे 50 रुपये प्रती शेअर भरावे लागले असते.   

7/7

गुंतवणूकदारांचा विश्वास

Reliance Industries Founder Dhirubhai Ambani Success Story and records in share market

धीरुभाईंच्या हाती आता खऱ्या अर्थानं सगळी सूत्र आली होती. त्यांनी दलालांना वाढीव वेळ नाकारला आणि अखेर नाईलाजानं त्यांना रिलायन्सचे शेअर चढ्या दरात खरेदी करत परत करावे लागले. त्या काळात शेअर बाजारात होणारी ही उलथापालथ आणि हा व्यवहार इतका गाजला की, शेअर मार्केट तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता. इथूनच गुंतवणूकदारांचा विश्वास धीरुभाईंनी जिंकला आणि भारतीय उद्योग जगतामधून रिलायन्स समूह आणि धीरुभाईंनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.