Fact Check: फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी खरंच 29 व्या वर्षी 53 वर्षांच्या महिलेशी लग्न केलं?
French President Emmanuel Macron India Visit : भारत 75 वा प्रजाकसत्ताक दिन साजरा करतोय. या निमित्ताने नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात भारताची झलक पाहिला मिळणार आहे. या कार्यक्रमाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यानुअल मॅक्रॉन यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यानिमित्ताने मॅक्रोन यांच्या लग्नाची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. इम्यानुअल मॅक्रॉन यांच्या पत्नीचं नाव ब्रिगिट मॅक्रॉन असं असून त्या इम्यानुअर मॅक्रॉन यांच्यापेक्षा तब्बल 24 वर्षांनी मोठ्या आहेत.