मोठ्या मनाचे राजे; इतिहासातील 'या' सम्राटांनी जनतेत सोनंही वाटलं, माहितीयेत त्यांची नावं?

Richest Kings in History: जसजशी इतिहासाची पानं उलगडू लागतात तसतशा अशा काही गोष्टी समोर येतता की पाहणारे थक्क होतात. इतिहासातील अशाच काही राजांविषयी आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाविषयी इथं जाणून घेऊया.   

Aug 23, 2024, 12:57 PM IST

Richest Kings in History: जगाचा इतिहास आणि या इतिहासाची पाळंमुळं शोधायची झाल्यास बरंच मागे जावं लागतं. तुम्ही कधी या इतिहासात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे का? 

 

1/8

ऐतिहासिक संदर्भ

Richest Kings in History used to distribute gold among people

ऐतिहासिक संदर्भ आणि उल्लेखांमध्ये आजवर अनेक राजांचं साम्राज्य, त्यांची कर्तबगारी आणि त्यांच्या युद्धनितीवर भाष्य केलं गेल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत राजे माहितीयेत? 

2/8

मनसा मूसा

Richest Kings in History used to distribute gold among people

माली साम्राज्यात 14 व्या शतकामध्ये सम्राट मनसा मूसा यांना इतिहासातील आतापर्यंतची सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं जातं. पश्चिम आफ्रिकेमध्ये असणाऱ्या सोन्याच्या खाणींमुळं त्यांच्या वाट्याला ही श्रीमंती आली होती. 1324 मध्ये मक्का येथील प्रसिद्ध तीर्थयात्रेदरम्यान त्यांनी इतकं सोनं वाटलं होतं की तिथं अनेक भागांमध्ये भरभराट आली होती.   

3/8

त्झार निकोलस II

Richest Kings in History used to distribute gold among people

रशियाचे अंतिम सम्राट त्झार निकोलस II यांनी 1894 ते 1917 मध्ये आपला कार्यकाळ असा काही गाजवला की, या काळात रशियानं विकासाचे आणि भरभराटीचे दिवस पाहिले. रशियातील नैसर्गिक खनिजसंपत्ती, तेलउत्पादन या कारणांनी त्यावेळी या श्रीमंतीत भर टाकली होती. 

4/8

लुई XIV

Richest Kings in History used to distribute gold among people

लुई XIV या राजाला सूर्याचा राजा असंही म्हटलं जातं. 1643 ते 1715 दरम्यान त्यांनी फ्रान्सवर सत्ता गाजवली. फ्रान्समधील आर्थिक सुबत्ता आणि स्थैर्याचं श्रेय याच राजाला दिलं जातं. 

5/8

राजा सुलेमान

Richest Kings in History used to distribute gold among people

इस्रायलचे बायबल शासक राजा सुलेमान त्यांच्या बुद्धिचातुर्यासाठी ओळखले जात होते. त्यांच्याच कार्यकाळात जैरुसलेम इथं पहिलं मंदिर उभारण्यात आलं होतं.   

6/8

अकबर

Richest Kings in History used to distribute gold among people

सर्वात श्रीमंत राजांच्या यादीत सम्राट अकबर हे नावही येतं. 1556 ते 1605 दरम्यान मुघल साम्राज्याचा सर्व कार्यभार सांभाळणाऱ्या अकबराची ओळख एक कुशल राज्यकर्ता म्हणूनही होती. अकबराची आर्थिक सुबत्ता ही त्याच कार्यकाळातील करप्रणाली आणि व्यापार मार्गांवरील नियंत्रणामुळं आली होती.   

7/8

सम्राट शेनजोंग

Richest Kings in History used to distribute gold among people

1067 ते 1085 दरम्यान चीनवर राज्य करणारे सम्राट शेनजोंग हेसुद्धा श्रीमंत राजांपैकी एक. त्यांच्या कार्यकाळात आर्थिक सुबत्तेचे दिवस चीननं पाहिले. याच दरम्यान सोंग राजवंशाती अर्थव्यवस्था, कृषी आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगती झाली.   

8/8

ऑगस्टस सीजर

Richest Kings in History used to distribute gold among people

रोमचे पहिले सम्राट अशई ओळख असणाऱ्या ऑगस्टस सीजर यानं ईसवीसमपूर्व 27 ते ईसवी सन 14 दरम्यानचा कार्यकाळ गाजवला. त्यांची संपत्ती इतकी जास्त होती की, रोमन साम्राज्याच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या पाचव्या भागाशी या संपत्तीची तुलना होत असे.