ऋषी सुनक यांच्या पत्नीने जपलीय भारतीय संस्कृती, सुधा मूर्तींच्या नातींची नावे पाहा

Akshata Murty Girl Child Name : ब्रिटिश पीएम ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांनी भारतीय संस्कृती जपली आहे. मुलींना दिली अतिशय खास नावे. 

Oct 11, 2023, 13:49 PM IST

Sudha Murty Grandchild Names And Meaning : वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक (Rishi Sunak )आणि यांच्या पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murty)यांनी परदेशात राहूनही भारतीय संस्कृती जपली आहे. अक्षता मूर्ती या सुधा मूर्ती यांची मुलगी आहे. त्यामुळे मुळात घरातच मोठ्यांचा आशिर्वाद किती महत्त्वाचा आहे याची जाणीव या सगळ्यातून होते.  ऋषि सुनक आणि अक्षता मूर्ती यांना दोन गोंडस मुली आहेत. या दोघींचीही नावे अगदी भारतीय परंपरेची आहेत. या नावांमध्ये दडलाय भारतीय संस्कृतीचा अर्थ. 

सुधा मूर्ती कायमच भारतीय संस्कृतीबद्दल संवाद साधत असतात. अशात त्यांच्या मुलीने परदेशात राहून भारतीय संस्कृती जपली आहे. यासोबतच काही इतर भारतीय संस्कृतीची नावे आणि त्याचा अर्थ सांगण्यात आला आहे. 

1/7

मोठ्या मुलीचं नाव

 Rishi Sunak And Akshata Murty gave Indian Names to Girls Know Beautiful Baby Girls Names on Indian Culture

ऋषी सनुक आणि अक्षता मूर्ती यांच्या मोठ्या मुलीचे नाव कृष्णा सुनक (Krishna Sunak) असे आहे. 'कृष्णा' हे नाव भारतीय हिंदू, संस्कृती जपणारे नाव आहे. कृष्ण हे भारतीय, हिंदू देवाचे नाव ज्याला भगवान विष्णूचा प्रसिद्ध अवतार मानला जातो. 'कृष्ण' या संस्कृत शब्दाचा अर्थ गडद, गडद निळा असा असतो. कृष्ण हे नाव मुलगा किंवा मुलगी दोघांसाठीही चांगले वाटते.   

2/7

दुसऱ्या मुलीचं नाव

 Rishi Sunak And Akshata Murty gave Indian Names to Girls Know Beautiful Baby Girls Names on Indian Culture

अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांनी आपल्या दुसऱ्या मुलीचे नाव 'अनुष्का' असं ठेवलं आहे. 'अनुष्का' या नावाचा अर्थ भारतीय संस्कृतीनुसार प्रकाशाचा किरण असा आहे. हा संस्कृत मधील अर्थ आहे. तर पर्शियननुसार 'कृपा' असा आहे. 

3/7

अशीच भारतीय संस्कृती जपणारी मराठी नावे

 Rishi Sunak And Akshata Murty gave Indian Names to Girls Know Beautiful Baby Girls Names on Indian Culture

अधिरा - चंद्राचा मंद प्रकाश, चंद्राइतकी सुंदर हे अतिशय युनिक नाव आहे. तसेच या नावाच्या मुली अतिशय कडक, हुशार आणि चमकणारी अशा असतात. अधिरा नावाच्या मुलींसाठी 2 हा शुभांक आहे.   

4/7

लावण्या

 Rishi Sunak And Akshata Murty gave Indian Names to Girls Know Beautiful Baby Girls Names on Indian Culture

अत्यंत सुंदर आणि आकर्षक असा लावण्या या नावाचा अर्थ आहे. लावण्या नावाच्या मुली अतिशय प्रभावी आणि गोड असतात. या नावाचा शुभांक हा 4 आहे. तसेच या मुली अतिशय मदत करणाऱ्या असतात. 

5/7

वेदिका

 Rishi Sunak And Akshata Murty gave Indian Names to Girls Know Beautiful Baby Girls Names on Indian Culture

वेद हे भारतीय संस्कृती जपणारे नाव आहे. वेद या नावाचा अर्थ असा आहे की, ज्ञानाचे प्रतिक. हे नाव अतिशय पारंपरिक आणि आधुनिक याचा परफेक्ट मेळ घालणारे हे नाव आहे. वेदिका 7 शुभांक आगे. वेद वरून वेदिका हे मुलीचे नाव प्रचलित झाले आहे. 

6/7

राधा

 Rishi Sunak And Akshata Murty gave Indian Names to Girls Know Beautiful Baby Girls Names on Indian Culture

राधा हे प्रेमाचं प्रितक आहे. राधा हे मुलीचे संस्कृत आणि हिंदी मूळचे नाव आहे, ज्याचा अर्थ "यश" आहे. हिंदू धर्मातील एक प्रसिद्ध व्यक्ती, राधा कृष्णाच्या आवडत्या शाश्वत पत्नींपैकी एक म्हणून ओळखली जात होती. सर्वोच्च देवी अनेकदा लक्ष्मीचा अवतार मानली जात असे. 

7/7

सिया

 Rishi Sunak And Akshata Murty gave Indian Names to Girls Know Beautiful Baby Girls Names on Indian Culture

सिया हे भारतीय वंशाचे दोन अक्षरी हटके नाव आहे. सिया या नावाचा अर्थ सितेच्या अर्थाप्रमाण. सिया हे संस्कृतमधील नाव आहे. अतिशय गोड मुलगी, मूनलाईट आणि सफेद गवत असा देखील याचा अर्थ आहे.