Ladakh Road trip : बाईक, दऱ्या, बर्फ अन् निसर्ग... राहुल गांधींप्रमाणे 'लडाख रोड ट्रीप'ला जाण्याचा खर्च किती?
Rahul Gandhi In Ladakh : तरुणाईला त्यांची भलतीच भुरळ पडली आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे त्यांची लडाख सफर आणि भेट.
Rahul Gandhi In Ladakh : काँग्रेस खासदार राहुल गांधी संपूर्ण देशाच्या आणि नाही म्हटलं तरीही जागतिक राजकीय वर्तुळाच्याही नजरा वळवल्या त्या म्हणजे त्याच्या 'भारत जोडो यात्रे'मुळं. जनमानसात जाऊन देशभरात पायी प्रवास करणाऱ्या राहुल गांधी यांनी आता पुन्हा एकदा सर्वांच्याच नजरा वळवल्या आहे.
1/13
Rahul Gandhi In Ladakh
2/13
3/13
बाईकर्स मित्रांनी त्यांना मदत केली
4/13
राहुल यांनी हा अनुभवही इथं घेतला
5/13
सहलीची काही खास छायाचित्र
6/13
तुम्हालाही लडाखच्या रोडट्रीपला जायचंय?
7/13
मुंबई आणि दिल्ली असे दोन पर्याय
8/13
दिल्लीहून लडाखला जायचं झाल्यास...
दिल्लीहून लडाखला जायचं झाल्यास तुम्ही विमानानं श्रीनगरला पोहोचू शकता. किंवा मग चंदीगढहून रस्तेमार्गानं लडाखला जाऊ शकता. मुंबईहून निघणार असाल तर श्रीनगरला पोहोचून तिथून बाईक भाड्यानं घेत किंवा मह स्वत:ची बाईक असल्याच थेट मुंबईहून लडाख गाठू शकता. इथं तुमच्याकडे बाईक रेल्वेनं श्रीनगरनजीकच्या रेल्वेस्थानकावर पाठवण्याचा पर्यायही असेल.
9/13
मुंबईहून लडाख...
10/13
प्रवासादरम्यानचे थांबे...
प्रवासादरम्यानचे थांबे, लहानमोठे ब्रेक घेत आणि वास्तव्याची ठिकाणं पाहता हा खर्च तीन ते चार हजारांच्या घरात जाईल. बाईकला टोल नसल्यामुळं हा खर्च इथं वाचतो. लडाखमध्ये राहण्यासाठी तुम्ही हॉस्टेल, होमस्टे अशा पर्यायांना निवडू शकता. इथं खर्चाचा आकडा दर दिवशी सरासरी 1200 रुपये पकडल्यास सहा ते सात दिवसांसाठी तुम्ही 6500 रुपये मोजता.
11/13
लडाखमध्ये फिरणं...
लडाखमध्ये फिरणं, खाणं आणि तिथले स्थानिक परवाने यांसाठीचा किरकोळ खर्च धरून जाऊन येऊन या सहलीसाठी तुम्हाला (बाईकवरून गेल्यास) माणसी जवळपास 45000 रुपये खर्च येईल (खर्च कमीजास्तही होऊ शकतो). एखाद्या Tour Company कडून गेल्यास तुम्हाला हा खर्च कमी येऊ शकतो. लडाखमध्ये काही ठिकाणांवर जाण्यासाठी परवान्याची गरज असते. तर, काही क्रमांकाची वाहनं इथं चालत नाहीत. त्यामुळं तुमच्याकडे कोणत्या आरटीओ पासिंगची बाईक आहे हेसुद्धा लक्षात घ्या.
12/13
लेहला पोहोचल्यानंतर ...
दिल्लीवरून लडाखला जायचं झाल्यास तुम्ही बाईकनं साधारण 950 किमीचं अंतर ओलांडता. लेहला पोहोचल्यानंतर तिथं अॅक्लेमटाईज झाल्यानंतरच म्हजेच तिथल्या वातावरणाशी तुम्ही एकरुप झाल्यानंतरच पुढील प्रवास सुरु करता. कमीत कमी एक किंवा दोन दिवसांत तुम्ही हा प्रवास करु शकता. खर्चाचं म्हणावं तर, सरासरी पेट्रोलसाठी तुम्ही 4000 ते 5000 रुपये खर्च कराल. तर, राहण्याखाण्यासाठी तुम्ही इथं होमस्टे, हॉस्टेल निवडू शकता. सरासरी इथं बंक बेडचे दर 700 रुपयांपासून आहेत. खासगी रुमसाठी तुम्हाला सोयीनुसार पैसे मोजावे लागतात. काही ठिकाणी किमान दरात चांगल्या रुम मिळून जातात. तर, काही ठिकाणी तुम्हाला अडीच हजार रुपयेही भरावे लागू शकतात.
13/13