Rohit Sharma: टायगर अभी जिंदा है...! टी-20 मध्ये रोहित शर्माने रचला इतिहास

Rohit Sharma: भारत विरूद्ध अफगाणिस्तान यांच्यात टी-20 सिरीजमधील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियासाठी धावून आला. या सामन्यात रोहितने शतक झळकावत इतिहास रचला आहे.

Jan 17, 2024, 20:54 PM IST
1/7

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने टॉप ऑर्डर फलंदाज पूर्णपणे फेल गेले. 

2/7

विराट कोहली आणि संजू सॅमसनला या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही

3/7

दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष होतं. पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाल्यावर रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. 

4/7

या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावलं. या सामन्यात रोहितने 69 बॉल्समध्ये नाबाद 121 रन्सची खेळी केली.

5/7

इतकंच नाही तर रोहित शर्माने टी-20 मध्ये इतिहास रचला आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 शतकं झळकावणारा तो पहिला फलंदाज ठरलाय.

6/7

22 रन्सवर 4 विकेट्स असा टीमचा स्कोर असताना ओपनिंगला आलेल्या रोहितने न डगमगता कॅप्टन्स इनिंग खेळली.

7/7

वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाची ही शेवटचा टी-20 आतंरराष्ट्रीय सामना असून वर्ल्डकपमध्ये रोहित शर्माचं स्थान पक्क मानलं जातंय.