रॉयल एनफिल्डची Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी तिचे चांगले- Challanging गुण पाहून घ्या

Royal Enfield Super Meteor 650 घेण्याचा विचार तुम्ही केला असेल, तर अगदी योग्य वेळेवर तुम्ही ही लिंक Open केली आहे. कारण, इथे आपण या बाईकबाबत जाणून घेणार आहोत. 

May 17, 2023, 08:52 AM IST

बाईक घेईन, तर Royal Enfield च घेईन. असा निर्धार अनेकांनीच केलेला असतो. गेल्या कैक वर्षांपासून Royal Enfield प्रेमींच्या आकड्यात अशानं मोठी भर पडली आहे. काहींना बाईकडे फिचर्स भावतात, तर काहींना तिचा लूक. तुम्ही यापैकी कोणत्या वर्गात मोडता? काय सांगता, तुम्हीही एनफिल्ड घेण्याचा विचार करताय? 

1/8

कंपनीची सर्वात महागडी बाईक

Royal Enfield Super Meteor 650 features price and latest updates

काही दिवसांपूर्वीच Royal Enfield नं Super Meteor 650 लाँच केली. सध्याच्या घडीला कंपनीची सर्वात महागडी आणि आकारानं प्रचंड दिसणारी बाईक म्हणून मिटीऑरकडेच पाहिलं जातं. 

2/8

बाईकची मूळ किंमत

Royal Enfield Super Meteor 650 features price and latest updates

3.49 लाख रुपये इतकी या बाईकची मूळ किंमत. आता मात्र हे आकडे वाढून बाईकची किंमत 3.54 लाख रुपये इतकी झाली आहे. दिसायला देखणी आणि ऑफरोडिंगसाठीच बनलेली ही बाईक तिच्या फिचर्समुळेही चर्चेत आली आहे. 

3/8

Royal अनुभव

Royal Enfield Super Meteor 650 features price and latest updates

या बाईकमध्ये बऱ्याच चांगल्या गोष्टी आहेत. ज्यामध्ये सर्वप्रथम मुद्दा येतो तो म्हणजे बाईकमुळं मिळणाऱ्या Royal अनुभवाचा. या बाईकमध्ये सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, LED लाइटिंग, LED टर्न इंडिकेटर, ब्लूटूथ फोन कनेक्टिविटी असे फिचर्स देण्यात आले आहेत. 

4/8

सीटींग अलायमेंट

Royal Enfield Super Meteor 650 features price and latest updates

लो स्लंग सीटमुळं बाईक चालवणाऱ्यांच्या पाठीला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असा दावा कंपनीनं केला आहे. 

5/8

इंजिन

Royal Enfield Super Meteor 650 features price and latest updates

तब्बल 648सीसीचं इंजिनची ही बाईक 47bhp/52.3Nm जनरेट करते. बाईक चालवतेवेळी तिच्या ताकदीचा सहज अंदाज लावता येतो. 

6/8

Challanging बाजू

Royal Enfield Super Meteor 650 features price and latest updates

चांगली बाजू पाहिल्यानंतर वाईट म्हणण्यापेक्षा बाईकची Challanging बाजूही पाहून घ्या. कारण, तिचं वजन आहे 241 किलोग्राम. सस्पेंशन स्टीफ असल्यामुळं या बाईकवर तुम्हाला गचके लागू शकतात. 

7/8

बाईकचं मायलेज

Royal Enfield Super Meteor 650 features price and latest updates

बाईक उंचीला कमी असल्यामुळं तिचा एग्झॉस्ट असमान रस्त्याच्या तळाला लागू शकतो. त्यामुळं इथं काळजी घेतली जाणं महत्त्वाचं. मायलेजच्या बाबतीत कंपनीकडूनही करण्यात आलेल्या दाव्यानुसार ही बाईक अवघं 22KM इतकंच मायलेज देते. 

8/8

(सर्व छायाचित्र- रॉयल एनफिल्ड)

Royal Enfield Super Meteor 650 features price and latest updates

बाईकचे चांगले आणि काहीसे वाईट मुद्दे आता तुमच्या समोर आहेत. त्यामुळं तुमच्या रायडिंग स्टाईलच्या अनुशंगानं आता पुढचा निर्णय घ्या. (सर्व छायाचित्र- रॉयल एनफिल्ड)