Richest Actresses: 'या' प्रसिद्ध अभिनेत्री त्यांच्या पतीपेक्षा बक्कळ कमाई करतात, जाणून घ्या

Actresses Who Earn More Than Her Husband:छोट्या पडद्यावरील या काही अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या नवऱ्यापेक्षाही दुप्पट कमाई करतात.या अभिनेत्री कोण आहेत, हे जाणून घेऊयात. 

Jan 11, 2023, 21:21 PM IST

Actresses Who Earn More Than Her Husband:छोट्या पडद्यावर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या कमी काळात प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. या अभिनेत्रींच्या मालिका घरात आवडीने पाहिल्या जातात. मात्र तुम्हाला माहितीय का छोट्या पडद्यावरील या काही अभिनेत्री आहेत, ज्या त्यांच्या नवऱ्यापेक्षाही दुप्पट कमाई करतात.या अभिनेत्री कोण आहेत, हे जाणून घेऊयात. 

1/5

Richest Actresses

Rupali Ganguly : अनुपमा मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेली रुपाली गांगुली छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे.या मालिकेने रुपालीचे आयुष्यच बदलले नाही तर ती टीव्हीची सर्वात महागडी अभिनेत्री बनली. ती एका एपिसोडचे मानधन 3 लाख रुपये घेते.त्यामुळे तुम्ही अंदाज लावू शकता की ती एका महिन्यात किती कमावत असेल. 

2/5

Richest Actresses

Divyanka Tripathi: 'बनू मैं तेरी दुल्हन'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या दिव्यांकाने 'ये है मोहब्बतें'मधून खुप प्रसिद्धी मिळवली. या मालिकेने तिला मोठी ओळख दिली. सध्या ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. मात्र आजही तिच्या फीमध्ये कोणतीही कपात झालेली नाही. आजही ती एका एपिसोडसाठी 1 ते 1.5 लाख रुपये घेते. तर तिचा पती विवेक दहिया तिच्यापेक्षा कमी कमावतो.  

3/5

Richest Actresses

Rubina dilaik:छोट्या पडद्यावरील रुबिना दिलीक ही आघाडीची अभिनेत्री आहे. कधी बिग बॉस तर कधी झलक दिखला जा मध्ये दिसणाऱ्या रुबिनाचा पती अभिनव शुक्ला हा देखील अभिनेता आहेय मात्र त्याच्यापेक्षा रुबिनाचीच जास्त चर्चा असते. अनेक रिअॅलिटी शोमध्ये दिसलेली रुबीना भरमसाठ फी घेते, असे म्हटले जाते.  

4/5

Richest Actresses

Dipika Kakar: दिपिका कक्कर देखील छोट्या पडद्यावरील आघाडीची अभिनेत्री आहे. दीपिका पती शोएबपेक्षा जास्त कमावते असे नाही तर त्याच्यापेक्षा श्रीमंत देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आजही दीपिका प्रत्येक एपिसोडसाठी 70 हजार रुपये घेते.

5/5

Richest Actresses

Anita Hassanandani: अनिता हसनंदानी आई झाल्यापासून लाइमलाइटपासून दूर आहे. अभिनयातून ब्रेक घेऊन सध्या ती आपल्या मुलाचे संगोपन करत आहे. पण टीव्ही असो किंवा चित्रपट, लोकांनी अनिताला भरभरून प्रेम दिले. सध्या ती पडद्यावर नेहमीच दिसत आहे. आज ती एका एपिसोडसाठी 50 हजारांपर्यंत मानधन घेते.