1 कोटी पगार अन् 6-7 तास काम... तरीही 'या' नोकरीसाठी घाबरतात लोक!

Tower Lantern Changer : फक्त लाइट बल्ब बदलण्यासाठी कोणी 1 कोटी रुपये पगार मिळणार आहे असे तुम्ही कुठे ऐकलं आहे का? पण अशाच एका नोकरीची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र, एवढा भरघोस पगार देऊनही फारसे लोक या नोकरीसाठी अर्ज करत नाहीयेत. कारण या कामात खूप धोका आहे. 

Jun 13, 2023, 18:17 PM IST
1/6

Tower Lantern Changer

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या नोकरीच्या जाहिरातीनुसार, ही नोकरी टॉवर लँटर्न चेंजरची आहे. ही नोकरी अमेरिकेतील साउथ डकोटा येथे आहे. यामध्ये तुम्हाला 600 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या सिग्नल टॉवरवर चढून त्याचा बल्ब बदलावा लागतो.

2/6

 Lantern Tower

हे टॉवर सामान्य टॉवर्सपेक्षा थोडे वेगळे आहेत. याची उंची जितकी जास्त वर जाते तितके ते निमुळते होत जातात. या टॉवरच्या टोकावर पोहोचणे आणि बल्ब बदलण्यासाठी तिथे उभे राहणे हे खूप कठीण काम आहे. टॉवरवर चढण्यासाठी सुरक्षेचा पर्याय म्हणून फक्त दोरीचा (सेफ्टी केबल) वापर केला जातो.

3/6

Tower Lantern Changer condition of work

मिरर यूकेच्या वृत्तानुसार, या नोकरीची सर्वात आवश्यक अट म्हणजे अर्जदाराला उंची भीती वाटायला नको. उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असायला हवा. एक वर्षापेक्षा कमी अनुभव असलेले लोक देखील अर्ज करू शकतात. उमेदवाराला वेतन अनुभवावर देण्यात येईल. पण सुरुवातीचेच उत्पन्न हे सामान्यपेक्षा खूप जास्त असणार आहे.

4/6

tower hight

जमिनीपासून 600 मीटर उंचीवर असलेल्या टॉवरच्या माथ्यावर चढण्यासाठी सुमारे 3 तास लागतात. टॉवरवरुन उतरायलाही तेवढाच वेळ लागेल. म्हणजे हे काम करायला 6 ते 7 तास लागतात. याशिवाय टॉवरच्या वरच्या बाजूला 100 किमी/तास वेगाने वारा वाहत असतो. त्यामुळे लाइट बल्ब बदलणे अवघड होऊन जाते.

5/6

Tower Lantern Changer salary

हे काम करणार्‍या व्यक्तीला 100000 पौंड (सुमारे 1 कोटी रुपये) वार्षिक वेतन दिले जाते. टॉवरचा बल्ब दर 6 महिन्यांत एकदा किंवा दोनदा बदलावा लागतो. टॉवरवर चढून हे काम त्या व्यक्तीला एकट्याने करावे लागते.

6/6

number of applicants this job is very less

मात्र, गलेलठ्ठ पगार असूनही अर्जदारांची संख्या खूपच कमी आहे. कारण हे काम अतिशय जोखमीचे आहे. सर्वात आधी, ही जाहिरात Science8888 नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आली होती, जी आतापर्यंत लाखो वेळा पाहिली गेली आहे. जाहिरातीच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती उंच खांबावर चढताना दिसत होते.