थिएटरबाहेर रांगा, 1 कोटी तिकीटांची विक्री; बहीण-भावाच्या नात्यावरील 'या' चित्रपटाने रचला होता इतिहास

भाऊ-बहिणीच्या सुंदर नात्यावर बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत अनेक चित्रपट तयार झाले आहेत. पण आज आम्ही तुम्हाला एका खास चित्रपटाबद्दल सांगणार आहोत. ज्या चित्रपटासाठी लोक थिएटरबाहेर रांगा लावत होते. 

| Aug 18, 2024, 18:48 PM IST
1/7

भाऊ-बहिणीच्या नात्याचे वर्णन

26 वर्षांपूर्वी एक उत्तम चित्रपट थिएटरमध्ये आला होता. या चित्रपटामध्ये भाऊ-बहिणीच्या सुंदर नात्याचे वर्णन केले होते. आजही लोकांना तो चित्रपट टीव्हीवर लोक आवडीने बघतात. विशेष म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता.

2/7

'बंधन' चित्रपट

1998 मध्ये अभिनेता सलमान खानचा 'बंधन' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. यामध्ये जॅकी श्रॉफ, रंभा, अश्विनी भावे, अशोक शराफ, शक्ती कपूर, मुकेश ऋषी, आसिफ शेख, अंजन श्रीवास्तव यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.

3/7

सलमान खान राजूच्या भूमिकेत

या चित्रपटात सलमान खानने राजूची भूमिका साकारली होती. अश्विनी भावे बहिणीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. एक भाऊ आपल्या बहिणीचे घर वाचवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडतो हे .बंधन.ने दाखवले.

4/7

गरीब कुटुंबातील मुलगी

या चित्रपटात राजू, पूजा आणि ठाकूर सूरज प्रताप यांच्याभोवती फिरते. ठाकूर सूरज प्रताप यांना एका गरीब कुटुंबातील मुलगी पूजा खूप आवडत असते. घरच्यांच्या इच्छेनुसार दोघेही लग्न करतात. त्यानंतर पूजा तिच्या लहान भाऊ राजूला सोबत घेऊन तिच्या सासरच्या घरी जाते. 

5/7

कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक

'बंधन' या चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. त्यातील अनेक दृश्ये अतिशय भावूक आहेत. सलमान खानसह चित्रपटातील सर्वच कलाकारांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. 

6/7

थिएटरबाहेर लोकांच्या रांगा

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर थिएटरबाहेर लोकांच्या रांगा लागल्या होत्या. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानच्या या चित्रपटाची 1 कोटी 7 लाख 64 हजार तिकिटे विकली गेली होती. 

7/7

21.45 कोटींची कमाई

चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली होती. या चित्रपटाचे बजेट 5.75 कोटी होते.  जगभरात या चित्रपटाने 21.45 कोटींची कमाई केली होती.