Celebrity Breakups : भारतीय - पाकिस्तान सेलिब्रेटींचा निकाह आणि मग तलाक, जाणून घ्या नावं

Indian-Pakistani Celebrity Divorce : हे केवळ सानिया आणि शोएबच्याच बाबतीत घडतंय, अशातला भाग नाही... तर याआधीही अनेक भारतीय आणि पाकिस्तान सेलिब्रेटींचा निकाह आणि मग तलाक असा प्रवास झाल्याची उदाहरणं आहेत

Nov 11, 2022, 16:50 PM IST

Sania Mirza And Shoaib Malik : भारताची लोकप्रिय टेनिसस्टार सानिया मिर्झा (Sania Mirza)... आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik)... क्रीडा जगतातलं हिट आणि हॉट कपल.. पण हे कपल लवकरच वेगळं होणार असल्याची चर्चा रंगली आहे... गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचं समजतंय. मात्र आता त्यावर शिक्कामोर्तब झालंय. सानिया आणि शोएबचा लवकरच तलाक होणार असल्याची माहिती शोएबच्या अगदी जवळच्या मित्रानं दिलीय... सध्या दोघंही वेगवेगळे राहतायत... सानिया मिर्झा मुलासोबत दुबईत राहतेय, तर शोएब पाकिस्तानात.. आता केवळ तलाकची औपचारिकता बाकी असल्याचं या मित्रानं स्पष्ट केलंय...हे केवळ सानिया आणि शोएबच्याच बाबतीत घडतंय, अशातला भाग नाही... तर याआधीही अनेक भारतीय आणि पाकिस्तान सेलिब्रेटींचा निकाह आणि मग तलाक असा प्रवास झाल्याची उदाहरणं आहेत. (Sania Mirza And Shoaib Malik Indian-Pakistani Celebrity Divorce nmp)

1/4

भारत-पाकिस्तान आणि 'तलाक'

Sania Mirza And Shoaib Malik Indian-Pakistani Celebrity Divorce nmp

बॉलिवूडची ख्यातनाम अभिनेत्री रीना रॉय (Actress Reena Roy) आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसिन खान (Pakistani cricketer Mohsin Khan) यांचा 1983 मध्ये निकाह झाला. रीना रॉय फिल्मी करिअर सोडून कराचीला राहायला गेली.. पण नंतर दोघांमध्ये वाद वाढले आणि घटस्फोट झाला.

2/4

भारत-पाकिस्तान आणि 'तलाक'

Sania Mirza And Shoaib Malik Indian-Pakistani Celebrity Divorce nmp

बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांची पहिली बायको मनारा सीकरी (Manara Sikri) पाकिस्तानी होती. दोघांचा तलाक झाल्यानंतर त्यांनी अभिनेत्री रत्ना पाठकशी (Actress Ratna Pathak) दुसरं लग्न केलं.

3/4

भारत-पाकिस्तान आणि 'तलाक'

Sania Mirza And Shoaib Malik Indian-Pakistani Celebrity Divorce nmp

जावेद जाफरीनं (Javed Jaffrey) पाकिस्तानी अभिनेत्री झेबा बख्तियारशी (Pakistani actress Zeba Bakhtiar) लग्न केलं. मात्र वर्षभरातच दोघांचा तलाक झाला  

4/4

भारत-पाकिस्तान आणि 'तलाक'

Sania Mirza And Shoaib Malik Indian-Pakistani Celebrity Divorce nmp

आता याच यादीत सानिया मिर्झा आणि शोएब मलिकची भर पडलीय... त्यांच्या प्रेमकहाणीचा दि एन्ड कसा आणि कधी होतो, याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलंय.