अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार 2' मधून संजय दत्त बाहेर! पण कारण काय?

'सन ऑफ सरदार'चा सिक्वेल येणार आहे. ज्यामध्ये आता अजय देवगणसोबत संजय दत्त दिसणार नाही. काय आहे प्रकरण? जाणून घ्या सविस्तर

| Aug 07, 2024, 13:00 PM IST
1/6

अभिनेता संजय दत्त

'सन ऑफ सरदार'चा सिक्वेल येणार आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि अजय देवगण पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसणार होते. मात्र, आता ते दिसणार नाहीत. 

2/6

'सन ऑफ सरदार 2'

2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'सन ऑफ सरदार'चा सिक्वेल येणार आहे. आता संजय दत्त 'सन ऑफ सरदार 2'मध्ये नसणार आहे.

3/6

रवी किशन

अभिनेता संजय दत्तच्या जागी आता 'सन ऑफ सरदार 2' मध्ये अभिनेता रवी किशनला घेण्यात आलं आहे. 

4/6

'बिल्लू'ची भूमिका

'सन ऑफ सरदार' चित्रपटात संजय दत्तने बिल्लूची भूमिका साकारली होती तर अजय देवगणने जस्सी रंधवाची भूमिका साकारली होती. 

5/6

कायद्याचे उल्लंघन

1993 च्या बॉम्बस्फोटानंतर, संजय दत्तने कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली. अटक झाल्यापासून संजय दत्त आजपर्यंत यूकेला जाऊ शकला नाही.  

6/6

कॉमेडी चित्रपट

'सन ऑफ सरदार' हा कॉमेडी अॅक्शन चित्रपट आहे. चित्रपटात संजय दत्त, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, मुकुल देव, विंदू दारा सिंह, अर्जन बाजवा आणि संजय मिश्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी यात काम केलं आहे.