Sankashti Chaturthi : प्रियजनांना द्या संकष्टी चतुर्थीच्या 'या' खास शुभेच्छा! What's app ला ठेवा स्टेटस

Sankashti Chaturthi 2024 : शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण गणरायाची पूजा केली जाते. गणेशाची आराधना करण्यासाठी दर महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जाते. आज वैशाख महिन्यातील एकदंत संकष्टी चतुर्थी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी काही खास मेसेजेस घेऊन आलो आहोत.

May 26, 2024, 08:22 AM IST
1/8

हार फुलांचा घेऊनी वाहु चला हो गणपतीला, आद्य दैवत साऱ्या जगाचे, पुजन करुया गणरायाचे, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

2/8

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:| निर्विघ्नं कुरू मे देव सर्वकार्येषु सर्वदा|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोर्या! सर्व गणेशभक्तांना संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा!

3/8

मोरया मोरया मी बाळ तान्हे तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी…

4/8

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

5/8

वंदन करतो गणरायाला, हात जोडतो वरद विनायकाला, प्रार्थना करतो गजाननाला, सुखी ठेव नेहमी… सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा!

6/8

रम्य ते रूप सगुण साकार, मनी दाटे भाव पाहता क्षणभर अंतरंगी भरूनी येत असे गहिवर, विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर.. आज संकष्ट चतुर्थी…. सर्व गणेशभक्तांना, संकष्ट चतुर्थीच्या शुभेच्छा…

7/8

बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो, नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो, संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

8/8

सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम