सारा अली खान NCB ऑफिसमध्ये पोहोचली
एनसीबीच्या चौकशीत महत्वाचा खुलासा
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल पुढे आल्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांची नावं समोर येत आहेत. एनसीबीकडून अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यानुसार सारा अली खानलाही एनसीबीने चौकशीसाठी बोलवलं आहे. सारा अली खान एनसीबी कार्यालयात पोहचली असून तिची चौकशी सुरु आहे. साराप्रमाणेच श्रद्धा कपूर, दीपिका पदुकोणचीही एनसीबी चौकशी होणार आहे.